शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

-तर बीएसएनएलची मोबाईल सेवा ठप्प !

By admin | Updated: July 19, 2014 00:35 IST

केंद्र शासनाच्या भारत संचार निगम लिमिटेड

अल्टिमेटम : कर वसुलीसाठी महापालिकेची नोटीसअमरावती : केंद्र शासनाच्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कडे मोबाईल टॉवरचे कर थकीत असून ते त्वरित भरावे, अन्यथा २१ जुलैपासून शहरातील मोबाईल सेवा ठप्प केली जाईल, असा निर्वाणीचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. कर वसुलीसाठी मिळालेल्या ‘अल्टिमेटम’ने बीएसएनएल हादरुन गेले आहे.महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने पाचही झोन कार्यालयातील सहायक आयुक्तांना थकीत कर वसुलीकरिता युद्धस्तरावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, सुषमा मकेश्वर, मदन तांबेकर व राहुल ओगले यांनी कृती आराखडा तयार केला आहे. थकीत कर असलेल्या मोठ्या रक्कमेच्या इमारती, मोबाईल टॉवर, संकुल आदी लक्ष्य करण्यात आले आहे. झोन क्र. १ चे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी बीएसएनएल कंपनीने खासगी इमारतींवर साकारलेल्या पाच मोबाईल टॉवर संदर्भात थकीत कराचा भरणा करण्यासाठी अंतिम नोटीस १५ जुलै रोजी बजावली आहे. झोन क्र. १ मध्ये बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर १० लाखांच्यावर कर थकीत आहे. हीच परिस्थिती शहरभर बीएसएनएल कंपन्याच्या मोबाईल टॉवरची आहे. मोबाईल टॉवर कंपनीने अनेक मालमत्ताधारकांना हाताशी धरुन परस्पर टॉवरची उभारणी केल्याचे दिसून येते. महापालिकेने कारवाईचा सपाटा सुरु केल्यानंतर हे नियमबाह्य टॉवर रीतसर करुन घेतले जात आहे. लाखो रुपये कराचे थकीत ठेवणाऱ्या बीएसएनएलने २१ जुलैपूर्वी कराची रक्कम भरली नाही तर मोबाईल टॉवर सील करुन सेवा ठप्प पाडण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. त्यानुसार नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वी थकीत कराची रक्कम भरण्यासाठी दोन वेळा स्मरण नोटीस बजावण्यात आल्या आहेत, तरीदेखील मोबाईल टॉवर साकारण्यात आलेल्या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने कारवाईची धडक मोहीम राबविण्याचे आदेश महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी दिले आहे. बीएसएनएलसह अन्य मोबाईल कंपन्यांच्या मोबाईल टॉवरकडे थकीत असलेल्या कराची रक्कम वसूल करण्यासाठी ही मोहीम निरंतरपणे सुरु राहील, अशी माहिती आहे. (प्रतिनिधी)या मालमत्ताधारकांना बजावल्या नोटिशीबीएसएनएल कंपनीचे उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरच्या ५ मालमत्ता धारकांना अंतिम नोटिशी बजावण्यात आल्या आहेत. यात राजेंद्र काकडे, सीा.एस. नवीन बिल्डर्स, योगिता पाटील, टेलीकॉम कॉलनी वसाहत व विद्याभारती एज्युकेशन मंडळाचा समावेश आहे. १० लाख रुपयांच्यावर कराची रक्कम थकीत असल्याची माहिती सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी दिली.वारंवार सूचना दिल्यानंतर सुध्दा बीएसएनएलने मोबाईल टॉवरवर थकीत असलेली कराची रक्कम भरली नाही. यापूर्वी नियमानुसार नोटीस बजावून कार्यवाही करण्यात आली आहे. आता टॉवर सील करुन मोबाईल सेवा ठप्प करण्याची कारवाई करावी लागेल.-नरेंद्र वानखडे,सहायक आयुक्त, झोन क्र. १.