अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कबोर व्याघ्र अभयारण्यातही १४ मार्च २०२० तपकिरी रंगाचे अस्वलीचे पिलू आढळून आले. ते अस्वलीच्या पाठीवर आपल्ला भावंडासमवेत बसलेले दिसून आले. एका अस्वलीच्या पाठीवर दोन रंगाची ही पिले त्या आईसमावेत ट्रॅप कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.मेळघाट व्याघ प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागात कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंदल्या गेलल्या तपकिरी (पांढऱ्या) अस्वलाची माहिती पुढे आली. ४ मार्चला हे छायाचित्र ट्रॅप कॅमेऱ्यात टिपले गेले. तपकिरी पांढऱ्या रंगाच्या या अस्वलीसोबत काळ्या रंगाच्या अस्वल वावरताना छायाचित्रात दिसत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पूर्व मेळघाट वनविभागातील चिखलदरा वनपरिक्षेत्रांतर्गत चिखलदरा बीट, चिखलदरा वर्तुळातील वनखंड क्रमांक ३९ मध्य, तपकिरी रंगाचे अस्वल २०१४ मध्ये वनकर्मचाऱ्यांनी बघितले. त्याचे छायाचित्रही टिपले आहे. व्याघ्र प्रकल्पाकडेही याची माहिती आहे. पण एप्रिल २०२० मध्ये प्रकाशझोतात आलेल्या अस्वलीच्या केसांचा रंग, २०१४ मधील तपकिरी अस्वलीच्या तुलनेत पांढुरका आहे. शरीरातील रंगद्रव्याच्या थरांमध्ये आनुवंशिक बदल झाल्यामुळे प्राण्याच्या केसांचे रंग बदलतात. पांढरे तपकिरी होतात. दरम्यान या नोंदीकडे बघता वेगळ्या अस्वलाची विदर्भातील ही तिसरी नोंद ठरली आहे.
बोर व्याघ्र अभयारण्यातही आढळले तपकिरी अस्वलीचे पिल्लू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST
४ मार्चला हे छायाचित्र ट्रॅप कॅमेऱ्यात टिपले गेले. तपकिरी पांढऱ्या रंगाच्या या अस्वलीसोबत काळ्या रंगाच्या अस्वल वावरताना छायाचित्रात दिसत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पूर्व मेळघाट वनविभागातील चिखलदरा वनपरिक्षेत्रांतर्गत चिखलदरा बीट, चिखलदरा वर्तुळातील वनखंड क्रमांक ३९ मध्य, तपकिरी रंगाचे अस्वल २०१४ मध्ये वनकर्मचाऱ्यांनी बघितले. त्याचे छायाचित्रही टिपले आहे. व्याघ्र प्रकल्पाकडेही याची माहिती आहे.
बोर व्याघ्र अभयारण्यातही आढळले तपकिरी अस्वलीचे पिल्लू
ठळक मुद्देविदर्भातील हा तिसरा प्रकार । मेळघाटात २०१४ मध्येही या अस्वलाची नोंद