शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी मोडले लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:00 IST

मजुरी करून पोट भरणाऱ्या जरूड येथील एका पित्याने त्यांच्या २२ वर्षीय मुलीचे लग्न शेंदूरजनाघाट येथील शुभम बागडे (२८) याच्याशी पक्के केले. त्यानुसार, ३ जुलै रोजी जरूड येथे साक्षगंध सोहळा पार पडला. साक्षगंधादरम्यान होणाऱ्या जावयाला ७ ग्रॅमची अंगठी व १५ ग्रॅम सोन्याचा गोफ असा १ लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने दिले.

ठळक मुद्देउपवर तरुणीचा स्वप्नभंग : तीन लाखांची मागणी; पाच जणांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड/जरूड : हुंडा म्हणून तीन लाख रुपये देण्यास नकार दिल्याने उपवर मुलाने नियोजित लग्न उधळून लावल्याची धक्कादायक घटना जरूड येथे घडली. साक्षगंधाच्या अवघ्या महिनाभरात त्या उपवर तरुणीच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. याप्रकरणी वरूड पोलिसांनी शेंदूरजनाघाट येथील उपवर मुलासह त्याच्या कुटुंबातील अन्य चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मजुरी करून पोट भरणाऱ्या जरूड येथील एका पित्याने त्यांच्या २२ वर्षीय मुलीचे लग्न शेंदूरजनाघाट येथील शुभम बागडे (२८) याच्याशी पक्के केले. त्यानुसार, ३ जुलै रोजी जरूड येथे साक्षगंध सोहळा पार पडला. साक्षगंधादरम्यान होणाऱ्या जावयाला ७ ग्रॅमची अंगठी व १५ ग्रॅम सोन्याचा गोफ असा १ लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने दिले.साक्षगंध निर्विघ्न आटोपल्याने मुलीकडील मंडळी आनंदी होती. लग्नाची तयारी जोरात सुरू झाली असताना, वरपक्षाकडील मंडळीने तीन लाख रुपये हुंड्याची मागणी केली. ते ऐकून वधुपित्याच्या पायाखालची जमीन सरकली. साक्षगंधात १ लाख १५ हजारांचे दागिने, पाच हजार रुपयांचे कपडे व अन्य खर्च झाला असताना, आता तातडीने तीन लाख रुपये कुठून द्यायचे, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला.हुंड्याची रक्कम देण्यास वधुपित्याने नकार दिला. त्यामुळे उपवर मुलासह त्याच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला. आरोपी उपवर शुभम बागडे याने वाग्दत्त वधूला फोन करून विवाहास नकार कळविला. यासोबतच साक्षगंधात मिळालेला सोन्याचा गोफ, अंगठी परत करणार नसल्याचेही सांगितले. त्यामुळे वधुपक्षाकडील मंडळी कोलमडून पडली.उपवर मुलासह त्याच्या कुटुंबातील चौघांनी आपल्या कुटुंबासह मुलीचा विश्वासघात केल्याची तक्रार वधुपित्याने ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी वरूड पोलीस ठाण्यात नोंदविली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी उपवर मुलगा शुभम बागडे, दिवाकर बागडे (५५), संकेत दिवाकर बागडे (३२), विठ्ठल ऊर्फ विठ्ू दिवाकर बागडे (२६) व एका महिला यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४०६, ५००, ५०७, ३४ व हुंडाबळी अधिनियमाच्या कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.केव्हा सुधारणार?जेवढे जास्त पंगतीला पाहुणे, तेवढे मोठे लग्न ही संकल्पना कोरोनाने धुळीस मिळविली. आता जिवाच्या भीतीने वºहाडी मंडळीच लग्नापासून दूर राहत आहेत. त्यातच शासनाच्या बडग्याने वºहाड्यांची संख्या ५० वर आली आहे. मात्र, हुंड्याची रक्कम कोरोनाकाळातही ‘जैसे थे’ आहे. समाजात बिकट प्रसंग उभा करणाऱ्या व दोन्ही पक्षांसाठी नाचक्की ठरणाऱ्या हुंड्याबाबत केव्हा सुधारणार, हा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.

टॅग्स :dowryहुंडाmarriageलग्न