शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

आदिवासी महिलांना मुख्य प्रवाहात आणा

By admin | Updated: February 23, 2015 00:53 IST

दीड टक्के आदिवासी बांधव शासकीय नोकरीत आहेत. आदिवासी महिलांनाही शिक्षणात पुढे आणून समाजाला सक्षम बनवावे, असे प्रतिपादन राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.

अमरावती : दीड टक्के आदिवासी बांधव शासकीय नोकरीत आहेत. आदिवासी महिलांनाही शिक्षणात पुढे आणून समाजाला सक्षम बनवावे, असे प्रतिपादन राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.कठोरा नाक्याजवळील विदर्भ महाविद्यालय परिसरातील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात रविवारी सकाळी १० वाजता आदिवासी पारधी समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतिश उईके, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके, संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक भास्कर सोळंके, दिलीप चव्हाण, पोलीस निरीक्षक विलास पवार, लक्ष्मण पवार, संस्था अध्यक्ष मधुकर चव्हाण, सचिव चरणदास सोळंके, राजेश चव्हाण, विवेक सोळंके उपस्थित होते. पहिल्या सत्रात राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. आपल्या मनोगतामध्ये पोटे यांनी आदिवासी पारधी समाज बांधवाना शिक्षण प्रवाहात येण्यासाठी आवाहन केले. आदिवासी बांधवाना केलेल्या भूखंडाच्या मागणीला शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. केवळ अडिच टक्के आदिवासी बांधव शासकीय नोकऱ्यावर आहेत. त्यामुळे हा टक्का वाढविण्यासाठी अधिकाअधिक आदिवासी बांधवानी शिक्षणाच्या प्रवाहात यावे, तसेच महिलांनीसुध्दा शिक्षणात पुढाकार घेऊन समाजाला सक्षम बनवावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. मेळाव्यात राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके यांनी संस्थेच्या रिक्त पदासाठी नेटसेट परीक्षा पात्र असणाऱ्या आदिवासी पारधी समाजातील विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची भूमिका दर्शविली. दुपारच्या दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थी व पालकांपुढील आव्हाने व त्यावरील उपाय या विषयावर परिसवांद कार्यक्रम पार पडला. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.