तिवसा : तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे गुरूपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होेते. यावेळी अनिल सावरकर, प्रमोद निमकर, जगदीश काळे व अन्य उपस्थित हाेते. शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
.............................
विद्यापीठ चौकात शिवप्रतिमेचे पुजन
अमरावती : विद्यापीठ शिवसेना शाखेच्यावतीने युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका स्वाती निस्ताने, मोहन क्षीरसागर व पदाधिकारी उपस्थित होते.
...................................................................
शेेगाव नाका ते कठोरा नाका मार्गावर खड्डे
अमरावती : शेगाव नाका ते कठोरा नाका मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याशिवाय रस्ताही उखडला आहे. यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
................................
झेडपीत नालीमध्ये साचले पाणी
अमरावती : जिल्हा परिषदेतील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीत पाणी साचले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखल्या गेला आहे. परिणामी नाली सफाई करणे आवश्यक आहे.
.............................................
शेतीची कामे पावसामुळे खोळंबली
अमरावती : गत दोन दिवसापासून पाऊस पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतीची कामे खोळंबली आहेत. अतिपावसामुळे शेतीत पाय गुडघ्यापर्यंत फसत असल्याने कामे करणे अवघड झाले आहे.