अमरावती : जिल्हा परिषदेतील पंचायत विभागातील छताची पडझड सुरू झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
.....................................
शासकीय कार्यालयात शुकशुकाट
अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन लावण्यात आला आहे. परिणामी शासकीय कार्यालयात राहणारी अभ्यागतांची गर्दीही ओसरली असल्याचे चित्र कृषी विभागात दिसून आले.
............................
महाजनपुरा येथील रस्ता उखडला
अमरावती : महाजनपुरा येथून भातकुलीकडे जाणारा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना तसेच नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
......................
बडनेरा ते उत्तमसरा रस्ता नादुरुस्त
भातकुली : तालुक्यातील उत्तमसरा ते बडनेरा रस्ता गत काही महिन्यांपासून नादुरुस्त आहे. यामुळे या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
.........................................
शहरात विविध मार्गावर कांदा विक्री
अमरावती : उन्हाळ्याच्या दिवसांत सध्या ग्रामीण भागातून कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी शहरात आणत आहे. त्यामुळे विविध मार्गांवर कांदा विक्रीची दुकाने थाटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.