अमरावती : जिल्हा परिषदेच्या अधिकारात गावात असलेल्या नझूलच्या जागा ग्रामपंचायतला हस्तांतरण करण्यात याव्यात, अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. प्रवीण मोहोड, मंगेश फाटे, निखिल बोके आदींनी निवेदन दिले.
................................
चौसाळा ते निमखेड रस्ता उखडला
अंजनगाव सुजी : चौसाळा ते निमखेड बाजार गावाकडे जाणारा डांबरी रस्ता उखडला आहे. रस्त्यावर ठिकठिकाण खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी तसेच वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
....................................
अविकसित उद्यानांचा विकास केव्हा?
अमरावती: महापालिकेच्या क्षेत्रातील अविकसित उद्याने विकासापासून दूरच असल्याने याचा फायदा परिसरातील नागरिकांना होत नाही. त्यामुळे जनहितासाठी अविकसित उद्याने विकसित करण्याची मागणी होत आहे.
................................................
बंद बायोमेट्रिक यंत्रणा सुरू होईना
अमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये लावण्यात आलेली बायोमेट्रिक यंत्रणा मागील काही महिन्यांपासून बंद पडली आहे. मात्र, ही यंत्रणा सुरू करण्यासाठी निधीची वानवा असल्याने पुन्हा सुरू करण्यास जिल्हा परिषदेची प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरत आहे.