शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कौंडण्यपूर नदीवरील पूल जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 22:54 IST

अमरावती-वर्धा जिल्ह्यांना जोडणारा श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील वर्धा नदीवरील पूल क्षतिग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : रस्त्यावरील लोखंडी सळाखी उघड्या

रितेश नारळे ।लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : अमरावती-वर्धा जिल्ह्यांना जोडणारा श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील वर्धा नदीवरील पूल क्षतिग्रस्त झाला आहे. पुलावरील असलेले सिमेंटच्या रस्त्यातील लोखंडी सळाखी उघड्या पडल्या असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तर संरक्षक लोखंडी कठडे चोरून नेले असून येथे अपघात झाल्यास ते सरळ मृत्यूला निमंत्रण देणारेच ठरणार आहे.वर्धा नदीवर असलेले वरूड बगाजी (निम्नवर्धा) धरणाची थोप कोंडण्यपूरपर्यंत आहे. यामुळे नदीला वर्षभर भरपूर पाणी असते. पुलावरून अधिक जड वाहने गेल्यामुळे तो खळखिळा झाल्याचे जाणवते. अनेकदा जड वाहनांच्या भारामुळे पूल हलल्याने येथे वाहनचालकांचे नियंत्रण सुटले आहे. पुलाची अवस्था दयनीय झाली असतानादेखील याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसते. यासंदर्भात अनेकदा मागणी करूनही या पुलाची दुरुस्ती करण्यात आली नाही. कोणतेही अधिकारी पुलाच्या पाहणीसाठी ईकडे फिरकतही नाहीत. या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कधीही अपघात होण्याची दाट शक्यता नाकारतात येत नाही. उघड्या सळाखी दुचाकीच्या चाकात घुसल्यास व संरक्षक कठडे आधीच तुटले असल्यामुळे चालक थेट नदीत पडतील, अशी अवस्था आहे.भाविकांची वर्दळ अन पुलाची चर्चादेवी रुक्मिणीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया कौंडण्यपूर येथे वर्धा व नागपूर जिल्ह्यातून येणारे भाविक वर्धा नदीवरील हा पूल ओलांडूनच येतात. यामुळे वर्धा जिल्ह्यापर्यंत सुखकर असणारा प्रवास केवळ या पुलामुळे वाईट अनुभव देऊन जातो. येथे येणारे भाविक या पुलाची दुरुस्ती व्हावी, अशी चर्चा स्थानिकांशी करताना दिसतात. यामुळे देव दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मनात प्रशासनाची खराब प्रतिमा तयार होत आहे.अमरावती येथील बियाणी चौक ते कौंडण्यपूरपर्यंत या मार्गासाठी शासनाने १३० कोटींचा निधी मंजूर केला. दिवाळीनंतर काम सुरु होईल. कठठ्यांचे काम त्यात आहे. पूलदुरुस्तीसाठी आता निधी मंजूर होत नाही. तरीही आम्ही पुलावरील खड्डे बुजविण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू.- दिनकर माहुरे, उपविभागीय अभियंता, सां.बा.वि.