शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Bribe: चार हजारांची लाच घेताना भूमिअभिलेखचे दोन अधिकारी ‘ट्रॅप’

By प्रदीप भाकरे | Updated: October 20, 2022 19:05 IST

Bribe News: प्रॉपर्टीकार्डवरील मयत प्रतिभा त्रिपाठी यांचे नाव कमी करण्यासाठीचे फाईल क्लिअर करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अचलपूर येथील भूमी अभिलेख उप अधीक्षक देविदास जंगलुजी परतेती (५२) व सहाय्यक नजुल परिरक्षण भूमापक अमोल गिरी (४१, यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

अमरावती - प्रॉपर्टीकार्डवरील मयत प्रतिभा त्रिपाठी यांचे नाव कमी करण्यासाठीचे फाईल क्लिअर करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अचलपूर येथील भूमी अभिलेख उप अधीक्षक देविदास जंगलुजी परतेती (५२) व सहाय्यक नजुल परिरक्षण भूमापक अमोल गिरी (४१, यांना रंगेहाथ पकडण्यात आले. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, अचलपुर येथे एसीबीने गुरूवारी ही कारवाई केली.

वडिलांचे नावे असलेली अचलपूर येथील सिट नं.२५मधील प्लाॅट न.१०८ चे प्रॉपर्टीकार्डवरील मयत प्रतिभा त्रिपाठी यांचे नाव कमी करण्यासाठीचे फाईल क्लिअर करण्यासाठी अमोल गिरी व देविदास परतेती हे १५ हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार एसीबीला प्राप्त झाली. त्या अनुषंगाने १२ सप्टेंबर रोजी केलेल्या पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तडजोडअंती आठ हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान गुरूवारी सापळा कारवाई दरम्यान अमोल गिरी याने पंचासमक्ष तक्रारदाराकडून ४ हजार लाच रक्कम स्वीकारली. त्याला रंगेहात पकडण्यात आले. दोन्ही आरोपींंना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत व देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सतिश उमरे व योगेशकुमार दंदे,युवराज राठोड, कूणाल काकडे, विनोद कुजांम, शैलेश कडु, प्रदीप बारबुद्धे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती