अमरावती : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यासह राज्यात बारा जिल्ह्यात राबविण्यात येणारी मागास क्षेत्र अनुदान निधी (बीआरजीएम) योजना आता ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत संपुष्टात आणली जाणार आहे. यापूर्वी ही योजना १३ आॅगस्ट २०१५ रोजी संपुष्टात येणार होती. केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयाने ही योजना बंद करण्याचे आदेश दिल्यामुळे यावर्षी या योजनेला कोणताही निधी मिळाला नाही. मात्र योजनेवर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची भवितव्य अंधातरी झाले आहे.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून चालणारी बीआरजीएफ योजना अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व इतर सहा अशा बारा जिल्ह्यांत कार्यान्वित होती. मागास क्षेत्रासाठी यातून कोट्यवधींचा निधी दिला गेला. मात्र २०१५-१६ मध्ये एक रुपयांचा ही निधी देण्यात आलेला नाही. बीआरजीएफमध्ये अनेक विकासकामे करण्यात आली. सन २००७-०८ पासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील कामांचा समावेश होता. या योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात येतात.डिसेंबरपर्यंत प्रकल्प गुंडाळण्याचे आदेशबीआरजीएफ हा प्रकल्प ३१ आॅगस्ट २०१५ रोजी समाप्त करण्यात येणार असल्याचे आदेश ग्रामीण विकास यंत्रणेला देण्यात आले. या योजनेअंतर्गत अद्यापपर्यंत चालू न केलेली कामे तत्काळ रद्द करुन निधी जिल्हास्तरावर जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. २००९-१० ते २०१४-१५या आर्थिक वर्षाचे प्राप्त झालेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र ३० जून २०१५ पूर्वीच सादर करण्याचे आदेश दिले होते. २०१४-१५ या वित्तीय वर्षाचा आॅडिट रिपोर्ट ३१ जुलै २०१५ सादर करण्याचे आदेश दिले.
बीआरजीएफ योजना डिसेंबरमध्ये गुंडाळणार
By admin | Updated: August 3, 2015 00:11 IST