शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

कारागृहात दबंग कैद्यांच्या ‘हंडी’ला ब्रेक

By admin | Updated: November 24, 2015 00:14 IST

उत्तुंग पाषाण भिंतीच्या आत कारागृहात कैद्यांची सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या चालते.

अमरावती : उत्तुंग पाषाण भिंतीच्या आत कारागृहात कैद्यांची सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या चालते. मात्र, या स्थितीत काही दबंग कैद्यांवर अंकुश लावण्याचे काम सुरू झाले आहे. याच श्रृखंलेत बराकीत गरम आणि ताजे जेवण मिळावे, यासाठी ‘हंडी’ बनविण्याची परंपरा मोडीत काढण्यात आली आहे. बराकींची आस्कमिक झाडाझडती घेण्याचा सपाटा सुरू झाल्यामुळे ‘हंडी’ला ब्रेक लागला आहे.कारागृहातील कैद्यांची दिनचर्या ठरली आहे. यात पहाटेची प्रार्थना, न्याहारी, जेवण, आंघोळ, खेळ, विश्रांती, रात्रीचे जेवण, झोपण्याची वेळही ठरलेली आहे. प्रशासनाच्या नियमावलीनुसारच कैद्यांना कारागृहात वावरावे लागते. परंतु रात्रीचे जेवण सायंकाळीच मिळत असल्याने कैद्यांना रात्रीच्या वेळी तेच थंड झालेले जेवण घ्यावे लागते. त्यामुळे बराकीतील काही दबंग कैदी रात्रीच्यावेळी वार्डन (सुरक्षा रक्षक), हवालदार, रक्षक आदींना हाताशी धरून गरम जेवण तयार करून अथवा वेगळी भाजी शिजविण्यासाठी ‘हंडी’ बनवितात. ही ‘हंडी’ बराकीच्या एका कोपऱ्यात कापड जाळून ऊब देऊन केली जाते. सायंकाळी मिळणारे जेवण रात्रीला या ‘हंडी’मध्ये गरम करून काही कैदी खातात. मात्र, हा प्रकार काही कैदीच करीत होते. ‘हंडी’ला सुरक्षा रक्षकाचे अभय मिळत होते. मात्र, कारागृहाचे अधीक्षक एस. व्ही. खटावकर यांनी ‘हंडी’ला पूर्णत: लगाम लावला आहे. अंतर्गत सुरक्षा अधिकाऱ्यांना बराकींची आस्कमिक झाडाझडती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे बराकीत कैद्यांकडे असलेले साहित्य, वस्तुंची तपासणी केली जात आहे. नियमित झाडाझडती सुरूअमरावती : या झाडाझडतीत कैद्यांजवळ नियमबाह्य साहित्य, वस्तू मिळाल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. या भीतीपोटी ‘हंडी’ बंद करण्यात आली आहे. कारागृहात अंडा बराक बंद असून यात कोणत्याही कैद्याला जेरबंद करण्यात आलेले नाही. सर्वांनाच सामान्य कैदी म्हणून वागणूक देण्यात येते. त्यामुळे मुंबई बॉम्बस्फोट असो, २६/११चा दहशतवादी हल्ला वा प्रसिध्द खून खटल्यातील आरोपी सर्वांना समान वागणूक कारागृहात मिळत आहे. मात्र, ‘हंडी’ हा प्रकार बराकीत रात्रीच्यावेळी चालत होता. ही बाब कारागृह अधीक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी नियोजनबध्दपणे ती बंद करण्यात आघाडी घेतली आहे. कारागृहात अलिकडे ११०० कैदी जेरबंद असून ५० पेक्षा जास्त महिला बंदी येथे आहेत. दर तासाने संचार फेरी : सुरक्षा अधिकाऱ्यांवर जबाबदारीडायनिंग टेबलच्या जेवणाला लगामकाही वर्षांपूर्वी येथील मध्यवर्ती कारागृहात डायनिंग टेबवर गरम आणि ताजे जेवण देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला होता. या उपक्रमाचा शुभारंभ माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला होता. मात्र डायनिंग टेबवरील जेवणात कैदी एकत्र येत होते. याचा फायदा काही कैदी घ्यायचे. त्यामुळे कारागृहात अप्रिय घटना, कट शिजावयास वाव मिळत होता. परिणामी डायनिंग टेबलवरील जेवणही बंद करण्यात आले आहे. आता कैद्यांना जेवण हे बराकीच्या परिसरातच दिले जात आहे.काय असते ‘हंडी’ ?विविध गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेले कैदी बराकीत जेरबंद असताना जेवण हे गरम अथवा ताजे मिळावे, यासाठी बराकीच्या कोपऱ्यात कापड, पेपर जाळून वाटीत शिजवतात. काही दबंग कैदी कारागृहातील दुकानातून साहित्य आणून भाजी तयार करतात. प्रत्येक बराकीत चार ते पाच कैदी एकत्र येऊन ‘हंडी’ तयार करीत होते. मात्र या प्रकारामुळे कैद्यांमध्ये सापत्नेची भावना निर्माण होऊन आपसात द्वेष, भांडण होण्याची शक्यता लक्षात घेता ‘हंडी’ प्रकाराला कारागृह प्रशासनाने आळा बसविला आहे.कारागृहात सुधारणा व पुनर्वसनासाठी प्रशासन कार्यरत आहे. कैद्यांमध्ये चांगल्या बाबी बिंबवण्यासाठी काही कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. बरकीत ‘हंडी’ गरम जेवण या प्रकाराला पूर्णपणे लगाम बसला आहे. त्याकरिता सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.- एस. व्ही. खटावकर, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह.