शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

भांडण करून मिळविला अन् अपक्षांना सोपविला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:57 PM

गणेश देशमुख अमरावती : अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केल्याच्या मुद्द्यावरून अमरावती जिल्ह्यात युवा ...

ठळक मुद्देअमरावती लोकसभा

गणेश देशमुखअमरावती : अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केल्याच्या मुद्द्यावरून अमरावती जिल्ह्यात युवा स्वाभिमान पक्षाने फटाके उडवून आणि गुलाल उधळून जल्लोष व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक कार्यालयाने या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीला दुजोरा देणारे कुठलेही अधिकृत वक्तव्य जारी केले नसले तरी 'वरच्या पातळीवर या घडामोडी झाल्या'चे खासगीत ते मान्य करताहेत.अमरावती मतदारसंघ आपल्याकडेच यावा, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी शक्य ती सर्व ताकद पणाला लावली. अखेरपर्यंत दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले. अखेरीस अमरावती मतदारसंघ हा पूर्वीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला गेला. बुधवारी पवारांनी अचानक अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना समर्थन जारी केल्यानंतर, कशासाठी केला होता हा अट्टहास, असा प्रश्न राष्ट्रवादीकरांना पडला. भांडून-झगडून मिळविलेले राज्य आपला राजा असे कुणा त्रयस्थाला भेट करणार असेल, तर राज्याच्या अस्तित्वासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या आम्हा सैनिकांची राजाच्या नजरेतील किंमत तरी काय समजावी, असा सवाल आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ्यांना अस्वस्थ करतो आहे.राजकारणाला गती, सोशल मीडियावर धूमया धक्कादायक घडामोडीमुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना अचानक गती आली आहे. नवनीत यांना समर्थन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठलाही उमेदवार उभा करणार नाही, असे खुद्द शरद पवार यांनीच बुधवारी मुंबईत स्पष्ट केल्याची माहिती छायाचित्रासह सोशल मीडियावर बुधवारी व्हायरल झाली. नवनीत आणि रवि राणा यांना शरद पवार पुष्पगुच्छ देत असल्याचे ते छायाचित्र असल्यामुळे या घडामोडीची नोंद मतदार आणि राजकारणी अशा दोघांकडूनही घेण्यात आली आहे.मुकुल वासनिकांच्या चर्चेला विरामकाँग्रेसचे नेता मुकुल वासनिक यांना रामटेक लोकसभा मतदारसंघाऐवजी अमरावतीतून लढविण्यासाठीचे प्रभावी प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या एका वजनदार फळीकडून केले गेलेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेला अमरावती मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यायचा आणि काँग्रेसच्या वाट्याचे औरंगाबाद राष्ट्रवादीला द्यायचे, असे अंतर्गत बदलाचे समीकरणही त्यासाठी मांडले गेले. रामटेकसाठी पूर्वाश्रमीच्या आयएएस अधिकाऱ्याचे नावही प्रस्तावित केले गेले. मुकुल वासनिक यांचे अमरावतीशी असलेले घट्ट नाते आणि दिल्लीतील त्यांचे महत्त्व या बाबीदेखील अपेक्षित समीकरणासाठी पूरक ठरणाºया होत्या; तथापि, बुधवारी घडलेल्या घडामोडींनंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या.आता थेट लढतनव्या समीकरणामुळे आता अमरावती मतदारसंघात थेट लढत होईल. यूपीए आघाडी घटकपक्षाच्या नवनीत राणा आणि शिवसेना-भाजप युतीचे आनंदराव अडसूळ यांच्यातील ती लढत असेल. मुकुल वासनिक यांना रणसंग्रामात उतरविण्याची काँग्रेसची खेळी यशस्वी झाली असती, तर लढत त्रिकोणी असती.