शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रम्हपुरीची ई-'वन वाघीण' मेळघाटात, आता राज्यातील वाघांची संख्या वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 18:16 IST

मेळघाटची दीडशे वाघांची क्षमता

अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : मेळघाटच्या जंगलाची दीडशे वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता आहे. आजमित्तीला तेथे 50 ते 52 वाघ आहेत. मेळघाटातील वाघांची संख्या वाढावी यासाठी ब्रम्हपुरीच्या ई-वन वाघिणीला मेळघाटात पाठविण्यात आले आहे. दोन वर्ष वयाची ही वाघीण जंगल वास्तव्यात सक्षम आहे. तिचे वय बघता ती मेळघाटात अनेक शावकांना जन्मास घालू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यातून मेळघाटात वाघांची संख्या वाढणार आहे.

चंद्रपूर-ताडोबात वाघांची संख्या वाढत आहे. वाघांची संख्या वाढल्यामुळे ते ब्रम्हपुरीच्या जंगलासह लगतच्या क्षेत्रातील गाव आणि शेत शिवाराकडे फिरकत आहेत. यात मानव वन्यजीव संघर्ष उद्भवत आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी, ज्या व्याघ्र क्षेत्रात वाघांची संख्या कमी आहे. त्या क्षेत्रात त्यांची संख्या वाढावी म्हणून या वाढत्या, जास्तीच्या वाघांना स्थलांतरित करण्याचे मंथन अभ्यासकांमध्ये सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून प्रथमच ब्रम्हपुरीच्या ई-वन वाघिणीला मेळघाटात पाठविण्यात आले आहे. ब्रम्हपुरीहून ही वाघीण व्हाया गोरेवाडा-नागपूरमार्गे मेळघाटात पोहचली. मेळघाटात दाखल होण्यापूर्वी ती गोरेवाडा प्राणी संग्रहालयात मुक्कामाला होती. 

देहरादुनहून नजरकॉलर आयडीसह मेळघाटात दाखल या ई-वन वाघिणीच्या प्रत्येक हालचालीवर, वन्यजीव संस्था देहरादून येथील डॉ. बीलाल हबीब यांच्या मार्गदर्शनात विशेष लक्ष दिले जाणार आहे. याकरिता देहरादूनहून खास तज्ज्ञ मेळघाटात नियुक्त केले जातील. हे तज्ज्ञ सॅटेलाईटच्या मदतीने त्या कॉलर आयडीवरून तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणार आहेत. नोंदी घेणार आहेत. यात गुगामल वन्यजीव विभागाचीही जबाबदारी वाढली आहे. कॉलर आयडी असलेली आणि आपले लोकेशन देणारी ही मेळघाटातील पहिली वाघीण ठरली आहे.

राज्यातील वाघांची संख्याराज्यात वाघांची वस्तीस्थाने वाढली आहेत. यात वाघांची संख्याही वाढली आहे. 2006 मध्ये राज्यात 103 वाघ होते. 2010 मध्ये ती 169 वर पोहचली. 2014 मध्ये राज्यात 190 वाघ नोंदल्या गेले. 2018 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेची आकडेवारी जाहीर व्हायची असली तरी 2014 नंतर राज्यात वाघांच्या संख्येची स्थिती सुधारली आहे. सन 2014 च्या आकडेवारीत ताडोबातील सर्वाधिक म्हणजे 100 ते 110 वाघ, मेळघाटातील 45 ते 50 वाघ आणि पेंचमधील 25 ते 30 वाघांचा समावेश आहे.

देशातील वाघांची संख्यादेशात 2006 मध्ये 1 हजार 411 वाघ नोंदल्या गेलेत. 2010 मध्ये 1 हजार 706 तर 2014 मध्ये 2 हजार 226 वाघ आढळून आले आहेत. देशपातळीवरही वाघांची संख्या वाढत आहे. वाघ ही भारताची ओळख असून जगातील 3 हजार 890 वाघांपैकी 57 टक्के वाघ भारतात आहेत.मेळघाटच्या जंगलाची दीडशे वाघ सांभाळण्याची क्षमता आहे. मावन व वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता, जेथे वाघांची संख्या कमी आहे तेथे वाघांची संख्या वाढविण्याकरिता, ज्या भागात वाघ अधिक आहे, तेथील वाघांचे स्थलांतर करण गरजेचे आहे. - जयंत वडतकर, मानद वन्यजीव रक्षक, अमरावती 

टॅग्स :Tigerवाघchandrapur-pcचंद्रपूरTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प