शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मातृ-पितृ छत्र हरवलेल्या दीक्षाचे ब्रेनडेडनंतर अवयवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 1:11 AM

नऊ वर्षांपूर्वी वडील आणि तीन वर्षांपूर्वी आई गमावलेल्या दीक्षाचे रविवारी अवयवदान करण्यात आले. नातेवाईकांनीच हा निर्णय घेऊन समाजासमोर अवयवदानाचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.

ठळक मुद्देनातेवाईकांनी जपला सामाजिक वसा : लहानपणी झाली होती मोठी शस्त्रक्रिया

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नऊ वर्षांपूर्वी वडील आणि तीन वर्षांपूर्वी आई गमावलेल्या दीक्षाचे रविवारी अवयवदान करण्यात आले. नातेवाईकांनीच हा निर्णय घेऊन समाजासमोर अवयवदानाचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.दीक्षा तीन वर्षांचीच असताना तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तिने तब्बल २२ वर्षे जीवनाशी संघर्ष केला. मात्र, शुक्रवारी ती ‘ब्रेनडेड’ झाली. येथील बेलपुऱ्यात राहणाºया दीक्षा प्रदीप मंडपे (२५) हिला अचानक उलट्यांचा त्रास जाणवला. शुक्रवारी तिला राजापेठ येथील हदयरोगतज्ज्ञ मनोज निचत यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले. तेथे ती कोमात गेल्याने तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तज्ज्ञ डॉक्टरांनी ती ‘ब्रेनडेड’ झाल्याचे घोषीत केले. कधीही तिचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे अवयवदान देऊन इतरांचा जीव वाचविला जाऊ शकतो, असा प्रस्ताव निचत यांनी दीक्षाचे दोन मोठे भाऊ व नातेवाइकांसमोर ठेवला. त्यांनी क्षणाचाही विचार न करता होकार दिला. यामध्ये दीक्षाची आत्या व मामांनी पुढाकार घेतला. ही माहिती अवयदान समिती व मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूला देण्यात आली. मूत्रपिंडविकारतज्ज्ञ अविनाश चौधरी यांच्याकडे दीक्षाचे अवयव काढून ते नागपूर व मुंबईला चार्टर्ड अ‍ॅम्ब्यूलन्सने पाठविण्याचे ठरले. त्यामुळे ब्रेनडेड दीक्षाला शनिवारी सायंकाळी ५ वाजता निचत यांच्या रुग्णालयातून चौधरी यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले. रविवारी दुपारी १२ वाजता उपयोगी पडणारे अवयव काढण्याची शस्त्रक्रिया सुरू झाली. सुमारे तीन तासानंतर ते अवयव विशेष हवाई अ‍ॅम्ब्यूलन्सने रवाना करण्यात आले.दीक्षाने दहावीपर्यंत शिक्षण घेतले होते. शुक्रवार सकाळपर्यंत तिची प्रकृती सामान्य असल्याची तिचा भाऊ राहुलने सांगितले. ती तीन वर्षांची असताना नागपूर स्थित वैद्यकीय महाविद्यालायत तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती तिच्या नातेवाइकांनी यावेळी दिली. त्यानंतर ती ठणठणीत बरी झाली. तिच्या वडिलांचा दूध डेअरीचा व्यवसाय होता. ब्रेनट्यूमरने त्यांचा नऊ वर्षांपूर्वी मृत्यू झाला, तर तीन वर्षांपूर्वी दुचाकीवरून पडल्याने तिच्या आईनेही जगाचा निरोप घेतला. यानंतर दोन्ही भावांनी दीक्षाच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळली. काळाने दीक्षावर अचानक झडप घातल्याचे डोंगराएवढे दु:ख मंडपे कुटुंबावर कोसळले. ते दु:ख बाजूला सारून दीक्षाचे अवयव समाजातील गरजूंच्या कामी यावेत, या उद्दात्त हेतूने तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिचे हदय, किडनी, यकृत, नेत्र व त्वचा असे विविध अवयव काढण्यात आले. त्यासाठी झोनल आॅर्गन ट्रान्सप्लांट समितीला पाचारण करण्यात आले होते. दीक्षाचा लहान भाऊ चेतन व पुणे स्थित मामा विनोद बावनगडे यांनी डॉक्टरांना सहकार्य केले. सर्वांची लाडकी दीक्षा गेल्याने भावांसह नातेवाईक गहिवरले होते.