‘त्या‘ मुलाचे अपहरण तीनदा सीसीटीव्हीत कैद (सुधारित)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:34 AM2021-02-20T04:34:26+5:302021-02-20T04:34:26+5:30

अमरावती : राजापेठ ठाणे हद्दीतील एका नगरातून चार वर्षीय मुलाचे बुधवारी रात्री ७.४५ वाजताच्यासुमारस सिनेस्टाईल अपहरण करण्यात आले. घटनास्थळाहून ...

'That' boy abducted three times imprisoned on CCTV (modified) | ‘त्या‘ मुलाचे अपहरण तीनदा सीसीटीव्हीत कैद (सुधारित)

‘त्या‘ मुलाचे अपहरण तीनदा सीसीटीव्हीत कैद (सुधारित)

Next

अमरावती : राजापेठ ठाणे हद्दीतील एका नगरातून चार वर्षीय मुलाचे बुधवारी रात्री ७.४५ वाजताच्यासुमारस सिनेस्टाईल अपहरण करण्यात आले. घटनास्थळाहून ५०० ते ७०० फुटांवर असलेल्या रविनगर स्थित शाळेजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सदर घटनाक्रम कैद झाला आहे.

घराशेजारी आजीसोबत खेळत असलेल्या चार वर्षीय मुलाला दुचाकीवरून आलेल्या पुरुष व एका महिला आरोपीने उचलून घेऊन गेले. मात्र, त्यानंतर काही वेळातच ते रविनगरजवळील शाळेजवळ पोहचले. या ठिकाणी मुलाला ऑटोमध्ये ठेवून ऑटो त्या ठिकाणावरून निघून गेला ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ऑटोतून मुलाला घेऊन जाण्यापूर्वी पोलिसांनी घटनास्थळावरीलसुद्धा दोन सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. यात आरोपी मुलाला दुचाकीवर घेऊन जाताना आढळुन आले आहे. पोलिसांकडे हा एकमेव पुरावा असून त्या दिशेने तपास सुरू आहे. मात्र, घटनेच्या २४ तासानंतरही या घटनेचा छडा अद्याप पोलिसांना लागलेला नाही.

या प्रकरणी पोलिसांनी चार वर्षीय मुलाच्या आई- वडील व आजीचे बयाण नोंदविल्याची माहिती आहे. त्यांची कुणासोबत भांडण होते का? मुलाचे वडील फळ व्यावसायी आहेत. त्यांच्या व्यापारासंबंधी कुणाशी भांडण आहे का? घराशेजारी कुणाशी वैर आहे का, या दिशेनेही तपास सुरू आहे.

बॉक्स

आरोपीचा कुणाशीही संपर्क नाही

खंडणीसाठी मुलाचे अपहरण करण्यात आले का? या दिशेनेही राजापेठ पोलीस तपास करीत आहे. मात्र, आरोपीने एकदाही मुलाच्या आई-वडिलांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी संपर्क केला नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासातसुद्धा बाधा येत आहे. आरोपींनी नेमके मुलाला कोणत्या दिशेने नेले याचे लोकेशन मिळत नाही. आरोपीच्या बारीक हालचालींवर शहर सायबर पोलीस नजर ठेवून आहेत.

बॉक्स:

मुलाच्या वडिलाला दोन पत्नी

ज्या मुलाचे अपहरण झाले, ते फळ व्यापारी आहेत. ते मुळचे राजस्थानातील असून, ३० वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त ते अमरावती शहरात आले. त्यांची पहिली पत्नी राजस्थानी असून अमरावती शहरात त्यांनी एका महिलेशी परापंरागत पद्धतीने विवाह केला. दुसऱ्या पत्नीच्या मुलाचे अपहरण झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून ही बाब समोर आली नाही. अपहरण करताना महिला दिसत असल्याने घरगुती वादातून तर अपहरण झाले नाही. नाया दिशेनेही तपास सुरू असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

-----------

त्या ऑटोचालकाचा शोध

अपहरणानंतर ज्या ऑटोतून ४ वर्षीय मुलाला नेण्यात आले, त्या ऑटोचालकाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून, रविनगरहून त्या मुलाला पंचवटीमार्गे वेलकम पाॅइंटजवळील पॉवर हाईसजवळ आणण्यात आले. तेथे उतरविल्यानंतर ऑटोचालक निघून गेला, अशी माहिती ऑटोचालकाने राजापेठ पोलिसांना दिली. मी फक्त प्रवासभाडे घेतले. मला या प्रकरणाची कुठलीही कल्पना नसल्याचे तो म्हणाला. त्या मुलाला ट्रॅव्हल्सने आरोपीने इतर जिल्ह्यात नेले असावे, अशी शंका पोलिसांना असून, त्या दिशेने तपास यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.

Web Title: 'That' boy abducted three times imprisoned on CCTV (modified)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.