टॅब जप्त : गुन्हे शाखेची कारवाईअमरावती : दुचाकीला लटकविलेल्या पिशवीतून पैसे व टॅब चोरी गेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरात घडली. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन आरोपींना शनिवारी अटक केली. रियाजोद्दीन मोहिनोद्दीन (२०,रा. आझाद नगर) व नुरुद्दीन रहिसोद्दीन (२३,रा. अहेबाब कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून एक टॅब जप्त करण्यात आला असून अद्यापर्यंत चोरीची १ लाख ८९ हजारांची कबुली त्यांनी दिलेली नाही. सीटी लॅन्ड येथील एका व्यावसायिकांच्या कापड विक्रीची वसुली करणारे सुधीर पंजवानी बसस्थानकजवळ उभा होता. दरम्यान त्यांच्या दुचाकीवरील पिशवी अज्ञात युवकांनी चोरून नेली. त्यात १ लाख ८९ हजार रुपये व एक टॅब होता. याबाबत त्यांनी शहर कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पाटील यांच्या पथकाने करून दोन आरोपींना अटक केली. तो टॅबने रियाजोद्दीन यांच्याकडे आढळून आला असून त्याने तो एका कार्यक्रमात छायाचित्र काढताना पोलिसांना आढळून आला, तर टॅबमधील सिमकार्डचा वापर नुरुद्दीन करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तो टॅब जमील कॉलनीतील नाल्याजवळ बेवारस आढळून आला व पैसे चोरीत आमचा काही संबध नसल्याचे आरोपीनी पोलिसांना सांगितले आहे. (प्रतिनिधी)
पैशांची पिशवी लंपास करणारे दोघे अटकेत
By admin | Updated: January 31, 2016 00:17 IST