शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही दुकाने निरीक्षक ‘आजारी’

By admin | Updated: May 25, 2017 00:02 IST

हुक्का पार्लर प्रकरणाचा धसका घेऊन सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील दोन्ही दुकाने निरीक्षक आजारी पडलेत. ते पंधरा दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेले आहेत.

हुक्का पार्लर प्रकरणाचा धसका : कामकाजाचा खोळंबा, कारवाई अपूर्णलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हुक्का पार्लर प्रकरणाचा धसका घेऊन सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील दोन्ही दुकाने निरीक्षक आजारी पडलेत. ते पंधरा दिवसांच्या वैद्यकीय रजेवर गेले आहेत. विदर्भातील तीव्र उन्हाचा तडाखा सहन करणारे हे अधिकारी हुक्का प्रकरणाला मात्र घाबरले, असे यातून प्रतित होते. सहायक कामगार आयुक्त कार्यालयात शॉपअ‍ॅक्टच्या नोंदणी प्रमाणपत्रांचे कामकाज सांभाळण्यासाठी जिल्ह्यात पाच दुकाने निरीक्षक आहेत. मोर्शी, अंजनगाव सुर्जी, अचलपूर व अमरावती शहरासाठी दोन, अशी निरीक्षकांची पाच पदे आहेत. मात्र सद्यस्थितीत चार निरीक्षकांची पदे भरली असून शहरातील एक पद रिक्त आहे. शॉप अ‍ॅक्टच्या नोंदणी प्रमाणपत्रासाठी येणारे आॅनलाईन अर्ज तपासणे, अर्जानुसार दस्तऐवजांची पूर्तता झाली आहे किंवा नाही, हे तपासून सात दिवसांच्या आता नोंदणी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया दुकाने निरीक्षकांना करावी लागते. शहरातील शॉपअ‍ॅक्ट नोंदणी प्रमाणपत्राच्या कामकाजासाठी दुकाने निरीक्षक म्हणून संजय दिघडे यांची नियुक्ती आहे. मध्यंतरी परतवाडा येथील दुकाने निरीक्षक अर्चना कांबळे यांच्याकडे अमरावतीचा प्रभार देण्यात आला होता. दरम्यान हुक्का पार्लर प्रकरणाचा भंडाफोड झाला आणि ‘अड्डा -२७’ सह अन्य पाच पार्लर्सच्या चालकांकडे सहायक कार्यालयातील शॉपअ‍ॅक्टचे नोंदणी प्रमाणपत्र आढळून आले. हुक्का पार्लर चालकांनी अन्य व्यवसायाच नोंदणी करून त्याआडून हुक्का पार्लर चालविण्याचा प्रकार उघड झाला. नोंदणी प्रमाणपत्र घेणाऱ्यांनी शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याचा प्रकार लक्षात घेता सहायक कामगार आयुक्तांनी संबंधित व्यावसायिकांविरूद्ध तक्रार करण्याचे आदेश दुकाने निरीक्षकांना दिलेत. अर्धवट सोडले कामअमरावती : अचानक झालेल्या या आदेशामुळे दोन्ही दुकाने निरीक्षकांची भंबेरी उडाली. मात्र, वरिष्ठांच्या आदेशानुसार दुकाने निरीक्षक कांबळे यांनी कोतवाली तर, दिघडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मात्र, हुक्का पार्लरर्स चालकांविरूद्धचे दस्तऐवज त्यांनी पोलिसांसमक्ष सादर केले नाही. याप्रकरणात आपण विनाकारण गोवले जाऊ नये, या धास्तीने दोन्ही निरीक्षकांनी आजारी पडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आता पोलीस तक्रारीचे तपासकार्यही थंडबस्त्यात राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणात तपासकार्य कसे करावे, याबाबत पोलिसांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.तक्रार परिपूर्ण नसल्याचा ठपकाहुक्का पार्लर : दुकाने निरीक्षकांना देणार पत्रलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शॉपअ‍ॅक्ट नोंदणी प्रमाणपत्रांशी संबंधित कामकाज पाहणाऱ्या दुकाने निरीक्षकांनी अड्डा २७ व कसबा कॅफेविरूद्ध परिपूर्ण तक्रार न दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात सहायक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत दोन्ही निरीक्षकांना पत्र पाठवून कळविले जाईल, अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी डी.बी.जाधव यांनी दिली आहे. दुकाने निरीक्षकांनी अड्डा-२७ व कसबा कॅफेविरूद्ध पोलिसांत तक्रार केली आहे. मात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे गुन्हे नोंदविण्यात अडसर येत आहे. या दोन्ही पार्लरविरूद्ध तक्रार करण्याची दुकाने निरीक्षकांची मूळातच इच्छा नव्हती. मात्र, वरिष्ठांचे आदेश व शिस्तभंगाची कारवाई होऊ नये, यासाठी नाममात्र तक्रार देण्यात आली आहे.कर्तव्यात कसूर, कारवाई का नाही ?अमरावती : हुक्का पार्लरविरूद्ध कोणताच परिपूर्ण मुद्दा तक्रारीत टाकण्यात आला नसून दुकाने निरीक्षकांनी शासकीय कामकाजाचा वेळ वाया घालून दिशाभूल केल्याचे निदर्शनास येत आहे. यातक्रारीच्या अनुषंगाने दोन्ही पोलीस ठाण्यांकडून सहायक कामगार आयुक्त कार्यालयास पत्र पाठवून कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सूचविण्यात आले आहे. मात्र, आता दुकाने निरीक्षकच आजारामुळे रजेवर गेल्यामुळे त्याकागदपत्रांची पूर्तता करणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सहायक कामगार आयुक्त आडे यांनी दुकाने निरीक्षकांना तक्रार करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा नोंदविली. मात्र, हुक्का पार्लर व्यवसायाविरुद्धचे सबळ दस्तऐवज पोलिसांना दिले नाहीत. परिपूर्ण तक्रार न करता कर्तव्यात कसूर केल्याचे यातून दिसून येत आहे. पोलीस चौकशीला ‘ब्रेक’प्रतीक्षा दस्तऐवजांची अद्याप पत्राचे उत्तर नाहीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ’अड्डा २७ व कसबा कॅफे’ या दोन्ही व्यापारी प्रतिष्ठानच्या चालकांविरूद्ध दुकाने निरीक्षकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या. मात्र, उपरोक्त दोन्ही प्रतिष्ठानांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याबाबतच्या दस्तऐवजांची पूर्तता न झाल्यामुळे याप्रकरणाच्या पोलीस चौकशीला ‘बे्रक’ लागला आहे.दस्तऐवजांच्या पूर्ततेसंदर्भात पोलिसांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयास पत्राद्वारे कळविले आहे. मात्र, अद्याप दस्तऐवज सादर न झाल्याने पोलिसांनाही चौकशी सुरु करण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. दोन्ही व्यावसायिकांनी शॉपअ‍ॅक्ट नोंदणीचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल केल्याचे सहायक कामगार आयुक्तांनी स्पष्ट केले असून या व्यावसायिकांविरूद्ध फौजदारीचे आदेश दिले आहेत. मात्र, दुकाने निरीक्षकांनी केवळ तक्रार करून दस्तऐवजांच्या पूर्ततेसंदर्भात हात वर केले आहेत. याव्यावसायिकांविरोधात सबळ पुरावे हाती लागल्यास पोलीस चौकशी करून गुन्हे नोंदविणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलिमा आरज यांनी दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणीपरभणीतून घेतले घनश्यामला ताब्यातलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये नवीनचंद्र भंडारी व अमित दुबे हे दोघेही नाहरकत प्रमाणपत्रात हुक्का पार्लर व्यवसायाचे नाव नमूद करताना कैद झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजचा सत्यता पडताळणी अहवाल न्यायालयीन प्रक्रियेत सबळ पुरावा असेल. त्यासाठी नागपूर येथील सायबर क्राईम विभागाकडे हे सीसीटीव्ही फुटेज तपासणीकरिता पाठविण्यात येणार आहे. नवीनचंद्र भंडारीने त्याचा भाऊ घनश्यामच्या नावे दस्तऐवजांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.‘पॉवर आॅफ अटर्नी’वर घनश्याम भंडारीने स्वाक्षरी केली आहे. घनश्यामचे सहकार्य नाहीअमरावती : या दोन्ही स्वाक्षरींची पडताळणी करण्यासाठी नवीनचंद्र व घनश्यामचे हस्ताक्षर तपासले जाईल. घनश्याम भंडारीचे हस्ताक्षर घेण्यासाठी त्यांना कोतवाली पोलिसांनी बोलविले आहे. त्यांच्याशी वारंवार संपर्क सुद्धा केला आहे. मात्र, त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. घनश्याम पोलिसांसमोर येण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे आता पोलिसच घनश्यामची चौकशी व त्याच्या हस्ताक्षराचा नमुना घेण्यासाठी परभणीला जाणार आहेत. घनश्यामने पोलिसांना सहकार्य न केल्यास त्याला अटक केली जाऊ शकते. हुक्का पार्लरचे प्रकरण चर्चिल्या जात असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नोटरीवरील हस्ताक्षराची पडताळणी तज्ज्ञांकडून केली जाईल. घनश्याम पोलिसांना सहकार्य करीत नसेल तर पोलीस परभणीला जातील. -आर.एस.लेवटकर, पोलीस उपनिरीक्षक, कोतवाली ठाणे.