शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनस्थळावरील दोन्ही मुख्य मार्ग खड्ड्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

चिखलदरा पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी परतवाडा, धामणगाव गढी व परतवाडा-घटांग-सलोना असे दोन मार्ग आहेत. दीड वर्षांपासून या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याचे नूतनीकरण व नव्याने चौपदरीकरण मंजूर आहे. परंतु, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा वाढलेला परिसर आणि वनविभागाच्या परवानगीअभावी रस्त्याचे काम पूर्णत: रखडले आहे.

ठळक मुद्देवनविभागाची आडकाठी; स्कायवॉकला नेण्यासाठी रस्ता कुठे? बैठका विनानिर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळाकडे जाणारे दोन्ही मार्ग खड्ड्यांत गेले आहेत. वनविभागाच्या परवानगीअभावी रस्त्याचे काम बंद आहे. परिणामी हे रस्ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरले आहेत. प्रशासनाच्या वारंवार होणाऱ्या बैठकी पूर्णत: फोल ठरल्या आहेत. शासकीय व दैनंदिन कामासाठी येणाऱ्या आदिवासींना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.चिखलदरा पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी परतवाडा, धामणगाव गढी व परतवाडा-घटांग-सलोना असे दोन मार्ग आहेत. दीड वर्षांपासून या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याचे नूतनीकरण व नव्याने चौपदरीकरण मंजूर आहे. परंतु, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा वाढलेला परिसर आणि वनविभागाच्या परवानगीअभावी रस्त्याचे काम पूर्णत: रखडले आहे. त्याचा फटका तालुका मुख्यालयाला येणाऱ्या गोरगरीब आदिवासींना बसत आहे. दररोज अपघातांची मालिका सुरू आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा परिसर गतवर्षापासून वाढविण्यात आला. त्याआधीपासून हे रस्ते अस्तित्वात आहेत. परिसर वाढताच व्याघ्र प्रकल्पाने आपले नियम लागू केले. त्यामुळे मेळघाटातील विकास आता खुंटला आहे.एकीकडे पर्यटनस्थळाच्या विकासासाठी ५०० कोटींपेक्षा अधिक निधी मागील शासनाने मंजूर केला. त्यातून स्काय वॉकसारख्या मोठ्या प्रकल्पाची निर्मिती सुरू आहे. दुसरीकडे रस्ता चौपदरीकरण व दुरुस्तीच्या परवानगीसाठी मेळघाट ते मुंबई अशा प्रशासन आणि मंत्र्यांच्या सतत होत असलेल्या बैठकांवर बैठका निष्फळ ठरल्या आहेत. यापुढे पर्यटनस्थळावरील रस्त्यांचे भविष्य उज्ज्वल होणार की अंधकारमय राहील, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.वनमंत्री ते विरोधीपक्षनेते याच मार्गानेविदर्भाच्या नंदनवनात पंधरा दिवसांत माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व त्यापूर्वी वनमंत्री संजय राठोड येऊन गेले. त्यांनासुद्धा या खडतर रस्त्याचा फटका बसला.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा