बालकदिनी समाजाला हाक : कुडकुडणाऱ्या चिमुकल्यांची केविलवाणी व्यथा अमरावती : आईसक्रीमच्या एका कोनसाठी दीडशे रूपये मोजून नंतर चिमुकल्याच्या सर्दीसाठी दवाखान्याचे उंबरठे झिजविणारे पांढरपेशे पालक एकीकडे तर थंडीत कुडकुडणाऱ्या नागड्या मुलांना अंगभर कापडही देऊ न शकणारे दुर्देवी मायबाप दुसरीकडे. आज बालकदिन साजरा करताना रस्त्याच्या कडेला, पुलाखाली, एखाद्या आडोशाला निजणाऱ्या उघडया-नागड्या चिमुरड्यांना मायेची, माणुसकीची उब मिळावी, एवढी अपेक्षा जागरूक समाजाकडून करीत आहोत. आजघडीला शहरात शेकडो बालके रस्त्यांच्या कडेला, उड्डाणपूलाखाली उघड्यावर निजतात. शहरातच नव्हे तर मोठ्या गावात गावकुसाबाहेरील वस्त्यांमधून शेकडो मुले उघड्यावर निजतात. शहरातील शाम चौक, राजकमल, बडनेरा, रेल्वे स्टेशनसह अनेक भागात वस्त्रांविना तर कुणी अर्धवट वस्त्रांमध्ये निजलेले पाहून माणुसकीला पाझर फुटतोे. थंडीतही अंगावर शहारा येतो.
उघड्या अंगाला हवीय माणुसकीची ऊब!
By admin | Updated: November 13, 2014 22:55 IST