शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

तत्कालीन आयुक्तांनी अनुभवली बोंद्रेंची पात्रता!

By admin | Updated: August 3, 2016 00:02 IST

सहायक पशू शल्यचिकित्सक म्हणून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत सचिन बोंद्रे यांची त्या कालावधीतील कारकीर्द वादग्रस्त राहिली....

नियमबाह्य नियुक्ती : प्रशासकीय मान्यतेचा घाटअमरावती : सहायक पशू शल्यचिकित्सक म्हणून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत सचिन बोंद्रे यांची त्या कालावधीतील कारकीर्द वादग्रस्त राहिली. त्याकडे अर्थपूर्ण कानाडोळा करीत तत्कालीन आयुक्तांनी बोंद्रेंमध्ये प्रचंड पात्रता अनुभवल्याने नियमबाह्य नियुक्तीचा घाट रचण्यात आला. महाराष्ट्र शासनाने २२ आॅगस्ट २०१४ च्या शासन निर्णयान्वये महापालिकेच्या आस्थापनेवर सहायक पशु शल्यचिकित्सकाचे एक पद मंजूर केले. मात्र या मंजूर पदावर सचिन बोंद्रे यांचीच वर्णी लावण्याचा घाट तत्कालीन आयुक्तांनी रचला. महापालिकेत शेकडो जण कंत्राटी तत्त्वावर काम करीत असताना त्यांना कायम करण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घेतला नाही किंवा पदनिर्मिती वा जी पदे मंजूर आहेत, तेथे अधिकारी - कर्मचारी देण्याबाबत मंत्रालयाकडे कुठला पाठपुरावा केला नाही. मात्र विशेष बाब म्हणून तत्कालीन आयुक्तांनी पद निर्मिती आणि बोंद्रेंसाठी वजन खर्ची घातले. अमरावती, चिखलीसह मुंबईतील बड्यांमुळे बोंद्रेंचे घोडे गंगेत न्हाले. बोंद्रे यांच्या थेट नियुक्तीबाबत तत्कालीन आयुक्तांवर नेमका काय दबाव होता, हे आता उघड होऊ लागले आहे. सत्ताधिशांतील काहींनी बोंद्रेंची फाईल वरपर्यंत चालविली. प्रशासनावर विशेष प्रस्ताव तयार करण्यासाठी दबावतंत्र वापरण्यात आले. दबावतंत्राला बळी पडून आणि शेकडो पदांचा अनुशेष असताना सहायक पशु शल्यचिकित्सक पदनिर्मिती प्रतिष्ठेची बाब करण्यात आली. पदाला मान्यता मिळाल्यानंतर बोंद्रे आणि त्यांच्या कंपूचे अर्धे काम फत्ते झाले. त्यापुढील जबाबदारी तत्कालीन प्रशासनावर टाकण्यात आली. सचिन बोंद्रे यांना शासनाने मान्य केलेल्या सेवा प्रवेशाच्या अधिन राहून, कंत्राटी पद्धतीतील सेवेचे कोणतेही लाभ त्यांना देय राहणार नाही. याच अटीवर त्यांना महापालिका सेवेत सहाय्यक पशू शल्यचिकित्सक या पदावर नियुक्त करण्याबाबतच्या प्रस्तावास १७ जानेवारी २०१५ रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. हा प्रस्ताव २० जानेवारी २०१५ च्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला. बोंद्रे यांचा प्रशासकीय विषय मंजुरीकरिता आल्याने त्याला मान्यता देण्यात आली. प्रशासकीय मान्यता आधीच दिल्यानंतर त्या प्रस्तावावर आमसभेत ‘सर्वानुमते मंजूर’ असे शिक्कामोर्तब करण्यात आले. अशाप्रकारे नव्याने निर्मित झालेल्या सरकारी पदावर तत्कालिन प्रशासनाने बोंद्रेंची थेट नियुक्ती करवून घेतली. (प्रतिनिधी)सत्य बाहेर येईलच !नगरविकास विभागाकडे झालेली तक्रार आणि ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताचा परिपाक म्हणून चौकशी अधिकाऱ्यांनी बोंद्रे यांच्या कंत्राटी कालावधीसह नियुक्ती, आमसभेचे प्रोसेडिंग व अन्य अनुषंगिक बाबींचे नव्याने अध्ययन चालविले आहे. जे सत्य असेल तोच निष्कर्ष राहील, अशी ग्वाहीसुद्धा चौकशी अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे बोंद्रेच्या नियमबाह्य नियुक्तीचा भंडाफोड होणार आहे. भाराभर शोकॉज नोटीस १८ मे २०१३ ला बोंद्रेंना तत्कालीन पशुवैद्यकीय विभागप्रमुखांनी समजपत्र दिले होते. याशिवाय २४ एप्रिल २०१४, २८ मे २०१४, १९ आॅगस्ट २०१६ व त्यानंतर २२ जानेवारी २०१५ ला बोंद्रेंना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली. याशिवाय नियुक्तीची मूळनस्ती स्वत:जवळ ठेवल्याच्या कारणावरून १३ आॅक्टोबर २०१४ ला उपायुक्त प्रशासन यांनी बोंद्रेंना समजपत्र दिले होते. याशिवाय बोंद्रेंविरुद्ध मनपास्तरावर भ्रष्टाचाराच्या तक्रारी सुद्धा झाल्यात. तथापि सर्व भाग बाजूला ठेऊन तत्कालिन आयुक्तांनी बोंद्रेंचा कामकाजावर समाधानकारक, असा मारलेला शेरा अर्थपूर्ण वाटाघाटीला बळ देणारा आहे.