शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

‘त्या’ विहिरीतून निघतेय चक्क उकळते पाणी! अमरावती जिल्ह्यातील बेनोडा येथील आश्चर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2023 08:30 IST

Amravati News बेनोडा (शहीद) येथील स्थानिक रहिवासी हरिश्चंद्र संपतराव वाघ यांच्या घरातील विहिरीला मागील चार दिवसांपासून अचानकपणे अतिशय गरम पाणी येत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

अमरावतीः बेनोडा (शहीद) येथील स्थानिक रहिवासी हरिश्चंद्र संपतराव वाघ यांच्या घरातील विहिरीला मागील चार दिवसांपासून अचानकपणे अतिशय गरम पाणी येत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

पाच वर्षांपूर्वी खोदलेल्या विहिरीतील पाण्याचे तापमान आतापर्यंत सामान्य होते. घरकाम तसेच पेयजल म्हणूनसुद्धा हे पाणी वापरले जात होते. मात्र, चार दिवसांपासून अचानकपणे गरम पाणी येत असल्याने नागरिकांनी निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे. योगायोगाने विहिरीला लागूनच एक दरगाह असल्याने हा काहीतरी दैवी चमत्कार असल्याच्या अफवासुद्धा पसरायला लागल्या आहेत.

पाणी वापरण्यास मनाई

घटनेची माहिती मिळताच बेनोड्याचे सरपंच, उपसरपंच यांनी भेट देऊन महसूल विभागाला माहिती दिली. त्या अनुषंगाने तहसीलदारांनी पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना घटनास्थळी पाठवून पाण्याचे नमुने भूगर्भशास्त्र विभागाकडे तपासणीसाठी पाठविले. अहवाल येईपर्यंत सदर विहिरीचे पाणी वापरण्यात मनाई केली आहे.

दोन-बादल्या सोडल्या

मोटरपंपाने खेचलेले पाणी गरम लागल्याने विहिरीतून गरम पाणी येत असल्याचे वाघ कुटुंबीयांना समजले. ही वार्ता गावात व पंचक्रोशीत पसरताच भेट देणारा प्रत्येक जण त्यांच्या विहिरीत दोर-बादली सोडून पाण्याची चाचपणी करीत आहे. बादलीमध्ये विहिरीतून उकळते पाणी वर येत आहे.

भूगर्भातील जलप्रवाह दिशा बदलवित असताना ते गंधकाच्या साठ्याच्या संपर्कात आल्याने भूजलाचे तापमान वाढते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.

- दीपक फरकाडे, भूगर्भशास्त्र अभ्यासक, बेनोडा

टॅग्स :Jara hatkeजरा हटके