शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पीआरसीच्या निरीक्षणात बोगस कामे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 05:00 IST

विधिमंडळाची पंचायत राज समिती ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात होती. समितीने पहिल्या दिवशी  सन २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेदा संदर्भात सीईओ व संबंधित खातेप्रमुखांनी साक्ष नोंदविली. दुसऱ्या दिवशी ८ ऑक्टाेबर रोजी  समितीच्या पाच पथकांनी जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांना भेटी देऊन तालुक्यातील निवडक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळांची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधिमंडळाची पंचायत राज समिती गुरुवारपासून जिल्हा दाैऱ्यावर होती. समितीच्या पथकांनी  शुक्रवारी सर्वच   १४ पंचायत समिती तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्रांना   भेटी दिल्या. दरम्यान अनेक विकासकामे निकृष्ट दर्जाची तसेच  बऱ्याच कामकाजात आर्थिक अनियमितता आढळून आल्याची माहिती समितीप्रमुख आमदार संजय रायमुलकर यांनी शनिवारी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना दिली. यात  दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विधिमंडळाची पंचायत राज समिती ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात होती. समितीने पहिल्या दिवशी  सन २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेदा संदर्भात सीईओ व संबंधित खातेप्रमुखांनी साक्ष नोंदविली. दुसऱ्या दिवशी ८ ऑक्टाेबर रोजी  समितीच्या पाच पथकांनी जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांना भेटी देऊन तालुक्यातील निवडक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळांची पाहणी केली. यासोबतच रस्ते, इमारती, सिंचन, बांधकाम, शालेय पोषण आहार, आरोग्य सोई-सुविधा अशा विविध कामांचे ऑन दी स्पॉट निरीक्षण केले. यात समिती प्रमुख आ. रायमुलकर यांनी मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्याचा दौरा केला. त्यांनी व अन्य चार पथकांंच्या निरीक्षणात अनेक ठिकाणी विकासकामात, शासकीय योजना, तसेच प्रशासकीय कामातही अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्याला जे अधिकारी, कर्मचारी दोषी असतील अशांवर  कारवाई केली जाणार असल्याचे आ.रायमूलकर यांनी स्पष्ट केले. समितीने अखेरच्या दिवशी जि.प.च्या सन २०१७-१८ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात सीईओ व संबंधित खातेप्रमुखांची  साक्ष नोंदविली. यासंदर्भात संबंधिताची विभागीय साक्ष घेतली जाणार आहे.ही प्रक्रियेनंतर अधिवेशनापूर्वी समितीच दौऱ्यातील अहवाल दोन्ही सभागृहाचे पटलावर ठेवला जाणार आहे. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, समितीचे उपसचिव विलास आठवले, सीईओ अविश्यांत पंडा उपस्थित होते.

गेली एकदाची पीआरसीपंचायत राज समिती जिल्ह्यात तीन दिवस होती. त्यांच्या दिमतीला मिनी मंत्रालयाची अख्यी यंत्रणा व्यस्त होती. शनिवारी सांयकाळी समितीने परतीची वाट धरताच जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

रिक्त पदे, अखर्चित निधी गंभीर विषयपीआरसी सदस्यांंनी अतिशय पारदर्शकपणे काम केले. मेळघाटातील आरोग्य व्यवस्था व अन्य बाबींची बारकाईने शहानिशा केली. जिल्हा परिषदेतील अखर्चित निधी चिंंतेचा विषय आहे. दरवर्षी लाखो रुपये शासनाकडे परत जातात. मात्र, निधीच अखर्चित राहू नये, यासाठी नियोजन होणे महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषदेतील रिक्त जागा, प्रभारींचा विषय गंभीर समितीच्या भेटीदरम्यान शासनाच्या विविध विभागांत रिक्त जागा तसेच प्रभारी अधिकाऱ्यांचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला.

महत्त्वाची खाते टार्गेटपंचायत राज समितीने तीन दिवसात घेतलेल्या आढाव्यात तसेच कामकाजाच्या निरीक्षणात जिल्हा परिषदेच्या आरोग्य, बांधकाम व अन्य विभागाची समिती प्रमुख व सदस्यांंनी झाडाझडती घेतली.

 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती