शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीत बोगस बियाणे गाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST

पावसाचे दिवस सुरू झाल्याने शेतकरी वर्ग खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. खरिपाला सुरुवात होत नाही तोच बाजारपेठेत बोगस बियाण्याचा शिरकाव झाल्याचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये धामणगाव तालुक्यात कृषी व पोलीस विभागाने देवगाव फाटा, तळणी, निंभारी, दत्तापूर आदी ठिकाणी बोलगार्ड-३ बीटी बियाणे पकडले आहे. या बनावट बियाण्यांत शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : पदाधिकारी, सदस्यांनी कृषी विभागाकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. अशातच आता पेरणीच्या तयारीला वेग येत असताना, धामणगाव रेल्वे तालुक्यात बनावट बीटी कपाशी बियाणे विकले जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या मुद्द्यावर जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा व्हिडीओ कॉफरन्सिंगद्वारे डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात शुक्रवारी अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, प्रियंका दगडकर, पूजा आमले, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य सुहासिनी ढेपे, अभिजित बोके, सुनील डिके, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे, कॅफो दत्तात्रय फिसके आदी सभागृहात उपस्थित होते.पावसाचे दिवस सुरू झाल्याने शेतकरी वर्ग खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. खरिपाला सुरुवात होत नाही तोच बाजारपेठेत बोगस बियाण्याचा शिरकाव झाल्याचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये धामणगाव तालुक्यात कृषी व पोलीस विभागाने देवगाव फाटा, तळणी, निंभारी, दत्तापूर आदी ठिकाणी बोलगार्ड-३ बीटी बियाणे पकडले आहे. या बनावट बियाण्यांत शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे अशा प्रकाराला आळा घालणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडून यावर कृषी विभागाकडून काय उपाययोजना केल्यात, याची जाब सदस्य सुनील डिके यांनी कृषी अधिकाऱ्यांना विचारला. यासोबतच सोयाबीन बियाणे, सिंगल सुपर फॉस्फेट या खतांच्या किमतीत तफावत येत आहे. हा मुद्दा सुहासिनी ढेपे यांनी उपस्थित केला. कृषिसेवा केंद्रांमध्ये बियाण्यांचे दरपत्रक, स्टॉकची नोंद, विक्री केलेल्या मालाची पावती आदींची तपासणी कृषी विभागाकडून होत नसल्याचे विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.दरम्यान, या सर्व मुद्द्यांवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा कृषिविकास अधिकारी यांना बोगस बियाणे धामणगाव तालुक्यात पकडण्यात आले असल्याचे सभागृहात सांगितले. खरीप हंगामात कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होवू नये, किमतीही नियंत्रणात राहाव्यात, यासाठी कृषी विभागाने या प्रकारांना आळा घालावा, अशा सूचना अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केल्या. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे, खते खरेदी करावी व त्याची पावती घ्यावी, असे आवाहन कृषी सभापती विठ्ठल चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी केले. सभेत इतर मुद्यांवरही चर्चा करून सर्व विषय मंजूर करण्यात आले.बांधकाम, पशुसंवर्धनचे विषयही चर्चेतपरतवाडा-अकोला या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी चिखलदरा तालुक्यातील बोराळा या गावाच्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात गिट्टी, मुरुमाची वाहतुक सुरू आहे. यामुळे हा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. वाहतुकीसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची परवानगी घेतली नाही. त्यामुळे संबंधिताकडून रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी सभापती दयाराम काळे यांनी केली. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती मिळत नसल्याचे सदस्य महेंद्र गैलवार यांनी सांगितले. यापुढे योजना राबविताना सदस्यांना माहिती देण्याचे आदेश सभापती बबलू देशमुख यांनी दिले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदagricultureशेती