शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शरीरसौष्ठवपटू विजय भोयर टायगर अ‍ॅम्बेसिडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 01:47 IST

येथील शरीरसौष्ठवपटू विजय भोयर याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने टायगर अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. तो वाघांचे संगोपन, संरक्षणासाठी प्रचार व प्रसार करणार असून, लवकरच तसा करार होणार आहे.

ठळक मुद्देबँकॉक येथे रजतपदक विजेता : वाघांचे संगोपन, संरक्षणासाठी करणार प्रचार व प्रसार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील शरीरसौष्ठवपटू विजय भोयर याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने टायगर अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. तो वाघांचे संगोपन, संरक्षणासाठी प्रचार व प्रसार करणार असून, लवकरच तसा करार होणार आहे.वाघांचे संंगोपन आणि संरक्षणासाठी प्रचार व प्रसार जोरकसपणे करता यावा, याकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांनी स्थानिक शरीरसौष्ठवपटू विजय भोयर यांची टायगर अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. विजय भोयर याने बँकाँक येथे नुकतेच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताला सिल्व्हर पदक मिळवून दिले आहे. तो स्पर्धेत दुसºया क्रमांकावर होता. भोयर हा अतिशय सामान्य कुटुंबातील आहे. त्याने मिळविलेल्या सिल्व्हर पदकपदकाने अमरावतीचे नाव देशपातळीवर मानाने घेतले जात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ‘टायगर टेक’ प्रमोशनसाठी भोयर याची निवड केल्यामुळे स्थानिक क्रीडापटुला नवी संधी मिळाली आहे. वाघांचे संरक्षण, संगोपनासह मानवी साखळीत वाघ का आवश्यक असल्याचा प्रसार, प्रचार करताना तो कर्मचाºयांना शरीरयष्टी सुखरूप ठेवण्याचे टीप्स देणार आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवानांना व्याघ्र सीमेवर वाघांची तस्करी, शिकार रोखण्यासाठी भोयर मार्गदर्शन करणार आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाघ, जंगलाप्रती प्रेम,आस्था निर्माण करण्यासाठी कार्यशाळा, चर्चांमध्ये तो आवर्जून सहभागी राहणार आहे. मानधनावर त्याची टायगर अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली जाणार असून लवकरच करार होईल, असे व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांनी सांगितले.व्याघ्र प्रकल्प मुख्यमंत्री कार्यालयाशी अटॅचमेळघाट व्याघ्र प्रकल्प हा ‘टायगर टेक’ अंतर्गत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मीडिया सेलशी जोडण्यात आला आहे. वाघांबाबतच्या घडामोडी, संरक्षण आणि संवर्धनाची माहिती कळवावी लागते. व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन, वाघांची वाढती संख्या अन्य दैंनदिन घडामोडी सीएम कार्यालयाला कळवाव्या लागतात, अशी माहिती टायगर क्राईम सेलचे उपवनसंरक्षक माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.