शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बॉडीबिल्डर नावेदच्या हत्येचे गूढ कायम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:12 IST

बॉडी बिल्डर नावेद इकबाल हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर हत्येची सत्यता बाहेर आली आहे.

घटनेच्या सत्यतेबाबत संभ्रम : काय झाले हत्येच्या दिवशी?लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बॉडी बिल्डर नावेद इकबाल हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर हत्येची सत्यता बाहेर आली आहे. जीमच्या वादातून ही हत्या झाल्याची सत्यता बाहेर आली आहे. मात्र, नावेद व रहिमच्या मित्रत्वात दरार निर्माण झाली कशी हा सुध्दा एक संशोधनाचा विषय बनला आहे. त्यामुळे या हत्ये मागे कोणाचे क्षडयंत्र तर नाही ना, हे गूढ अद्याप कायम आहे. माहितीनुसार, घटनेच्या दिवशी असोरिया पेट्रोल पंपासमोरील सिडिंकेट बँकेच्या एटीएमसमोर रहिम व नावेदचा वाद उफाळून आला, नावेद हा रहिमवर भारी पडत होता. नावेदने रहिमचा गळा हाताने आवळून धरला होता. त्यावेळी झिशान व जमिल कुरेशी हे मध्यस्थी करण्यासाठी गेल्याचे झिशाननेच पोलिसांना सांगितले आहे. नावेदचा हात रहिमच्या गळ्यापासून दुर करण्याचे प्रयत्न झिशानने सुरु केले होते. मात्र, नावेदची पकड मजबूत असल्यामुळे तो रहिमला सोडवू शकला नाही. त्यावेळी नावेदने झिशानला दुसऱ्या हाताने ढकलून दुर सारले. तेव्हा संतप्त झिशानने कमरेतील चायना चाकू काढून नावेदच्या हातावर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाकुचा वार नावेदच्या हातावर न लागता तो थेट नावेदच्या मानेवर बसला. त्यामुळे नावेद गंभीर जखमी झाला, त्याची रहिमची पकड कमजोर पडली आणि रहिम त्याचा हातातून सुटला. आता नावेदला आपल्यावर हल्ला करणार असल्याचे पाहून झिशानने नावेदवर पून्हा वार करणे सुरु करून हत्या करण्यात आली. त्यानंतर झिशानने अमरावतीवरून थेट नागपूर आणि पुलगाव मार्गाने चंद्रपुर आणि तेथून वणी पोहोचला. दरम्यान झिशानचा भाऊ आलीशान त्याला वणीला भेटायला आल्याचे झिशानने पोलिासंना सांगितले. त्याचवेळी पोलिसांनी दोन्ही भावाना अटक केली. झिशानच्या पोलिसांना सांगितल्याप्रमाणे घटनास्थळी रहीम आणि जमिल कुरेशीशिवाय कोणी नव्हते. नावेदच्या हत्येबाबत शहरात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. नावेदची हत्या जीम चालविण्याच्या वादातून झाल्याची सत्यता बाहेर आली आहे. मात्र, यामागे आणखी काही कारण असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.झिशानचा आत्महत्येचा प्रयत्नरविवारी नागपुरी गेट पोलिसांनी झिशानला राजापेठच्या कोठडीतून नागपुरी गेट ठाण्यात आणले. पोलिसांनी त्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कक्षातील बेंचवर बसविले होते. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन अचानक रडणे सुरू केले आणि मला पश्चाताप होत असून मला जगायचे नाही म्हणून झिशानने बेंचवर जोराने डोके आपटून स्वत:ला जखमी केले. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा झिशानवर नोंदविला आहे. मात्र, घटनेनंतर झिशानला लगेच पश्चाताप झाला नसून तीन दिवस ओलांडल्यानंतर त्याला पश्चाताप कसा झाला, असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित झाला आहे. जमील कुरेशी साक्षीदारनावेद हत्याकांड प्रकरणात जमील कुरेशी प्रत्यक्षदर्शी आहे. त्याच्या जागेवरील जीम हा रहीम चालवित होता. रहिमसोबतच करार संपल्यानंतर तो जीम चालविण्यासाठी जमीलने नावेदला तयार केल्याची चर्चा आहे. मात्र, रहिमला तो जीम सोडायचा नव्हता. याच कारणावरून रहीम व नावेदचा वाद उफाळला. रहीम व नावेद हे दोघेही मित्र होते. घटनेवेळी जमील आणि रहीम असोरिया पेट्रोलपंपासमोरील सिडिकेंट बॅकेसमोर पोहोचले. तेथेच नावेदची हत्या झाली. रहीम व नावेदचा वाद हा जमील कुरेशीच्या जागेवरून सुरु झाला होता.