शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराच्या आश्रमशाळेत गादीखाली मृतदेह, तिसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार; आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 08:56 IST

शिवम सनोज उईके या विद्यार्थ्याचा बुधवारी रात्री ८.३० वाजता शाळेतीलच खोलीत झोपण्यासाठी वापरत असलेल्या गाद्यांखाली मृतदेह आढळून आला.

- नरेंद्र जावरे चिखलदरा (जि. अमरावती) : कारंजा घाडगे (जि. वर्धा) तालुक्यातील नारा येथील दादाराव केचे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या मेळघाटातील शिवम सनोज उईके या विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आर्वीचे आमदार दादाराव केचे व शाळा प्रशासनाविरुद्ध अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केली. 

नागपूर येथे शवविच्छेदनाचे चित्रीकरण झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी शिवमवर डोमा (ता. चिखलदरा) या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या शाळेत आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. शिवम सनोज उईके या विद्यार्थ्याचा बुधवारी रात्री ८.३० वाजता शाळेतीलच खोलीत झोपण्यासाठी वापरत असलेल्या गाद्यांखाली मृतदेह आढळून आला. याची माहिती शाळा प्रशासनाने दिलीच नाही.

शिवाय डोक्याला मार असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्रावसुद्धा झाल्याचे त्याच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे. शिवम बुधवारी सकाळी नाश्ता केला तेव्हापासून बेपत्ता होता. रात्री ८.३० वाजता त्याचा मृतदेहच विद्यार्थ्यांना आढळून आला. त्याचा मृत्यू केव्हा झाला, हे वैद्यकीय अहवालात स्पष्ट होईल.

घटना नेमकी काय?मृतक शिवम इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत होता. ३० रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. तो शाळेतील हॉस्टेलच्या गाद्या ठेवतात त्या खोलीत गाद्यांच्या ढिगावर झोपला होता. तो झोपेतच खाली पडला व त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :Amravatiअमरावती