शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह आढळला विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 01:22 IST

गाडगेनगर हद्दीतील ख्रिस्त कॉलनीतून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय चिमुकलीचा मृतदेह मंगळवारी परिसरातीलच एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि अग्निशमनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

ठळक मुद्देख्रिस्त कॉलनीतील घटना : आकस्मिक मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गाडगेनगर हद्दीतील ख्रिस्त कॉलनीतून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय चिमुकलीचा मृतदेह मंगळवारी परिसरातीलच एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि अग्निशमनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.चांदूर बाजार येथील रहिवासी काबरा कुटुंबीयांची सात वर्षीय मुलगी प्रीती ही मतिमंद असल्यामुळे तिला अमरावती येथील आशादीप मतिमंद विद्यालयात शिक्षणासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी काबरा कुटुंबीय कॅम्प रोड स्थित भाड्याच्या घरात सामान व्यवस्थित लावत असताना प्रीती ही घराच्या आवारातून बेपत्ता झाली. या घटनेची तक्रार काबरा कुटुंबीयांनी गाडगेनगर पोलीसठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला.प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजश्री चंदापुरे करीत आहेत. या प्रकरणाच्या तपासात त्यांनी व्हायरलेसद्वारे पोलीस यंत्रणेला माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू केली होती. शोधपत्रिका काढून प्रीतीची शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.दरम्यान, रविवारी सकाळी ख्रिस्त कॉलनीतील एका विहिरीत प्रीतीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेच्या माहितीवरून गाडगेनगरचे पोलीस उपनिरीक्षक विनोद चव्हाण यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने प्रीतीचा मृतदेह बाहेर काढला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात तिचा मृतदेह ठेवण्यात आला आहे. पुढील चौकशी पोलीस करीत आहेत.बेपत्ता झालेल्या प्रीती काबराचा मृतदेह विहिरीत आढळला. अग्निशमनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरू आहे.- विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक, गाडगेनगर

टॅग्स :Deathमृत्यू