शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत तरुणीचा मृतदेह; हत्या की आत्महत्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:28 IST

एक्स्प्रेस हायवेच्या जुन्या टोलनाक्याजवळील विहिरीत एका ३० वर्षीय तरुणीचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत शुक्रवारी आढळून आला.

ठळक मुद्देएक्स्प्रेस हायवेवरील जुन्या टोलनाक्याजवळील घटना : शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

आॅनलाईन लोकमतअमरावती : एक्स्प्रेस हायवेच्या जुन्या टोलनाक्याजवळील विहिरीत एका ३० वर्षीय तरुणीचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत शुक्रवारी आढळून आला. तो मृतदेह काढत असताना विहिरीत सुसाइड नोट आढळून आली असली तरी ती आत्महत्या की हत्या हे अनुत्तरित आहे. सुसाइड नोटनुसार, आईच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्या तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तथापि, उशिरा रात्री ‘तो’ मृतदेह एका सामाजिक कार्यकर्तीचा असल्याची चर्चा शवागार परिसरात असल्याने प्रकरणाचे गूढ वाढले आहे.शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना उघड झाल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी अग्निशमनच्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढला. त्याचवेळी विहिरीच्या पाण्यात तरंगत असलेली चिठ्ठी पोलिसांनी बाहेर काढली. या चिठ्ठीत 'मी माझ्या आईच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे’ असे नमूद आहे. त्याला गाडगेनगर पोलिसांनी दुजोरा दिला आहे. टोलनाक्याजवळील मेनशा गार्डन नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेतशिवारातील विहिरीत एका ३० ते ३५ वयोगटातील तरुणीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती शिवसेनेचे उपशहरप्रमुख अमोल निस्ताने यांनी सर्वप्रथम गाडगेनगर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक बन्सोडे यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी अग्निशमनच्या मदतीने पाण्यात तरंगत असलेली एक चिठ्ठी व मृतदेह बाहेर काढला. मृत तरुणीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून आत्महत्येचे कारण स्पष्ट केले असले तरी ती चिठ्ठी त्याच तरुणीने लिहिली की मागाहून अन्य व्यक्तीने ती लिहून पाण्यात टाकली, याबाबत पोलिसांनी चौकशी आरंभली आहे.तत्पूर्वी, मृतदेह इर्विनमधील शवविच्छेदन गृहात पाठवून पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी तपोवन प्रभागातील नागरिकांची चौकशी केली. मात्र, त्या तरुणीला कुणीही ओळखत नव्हते. याबाबतची माहिती मिळताच नगरसेविका प्रमिला जाधव यांच्यासह मुरलीधर वाईकर व तपोवन प्रभागातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.तरुणीची हत्या करून तिला विहिरीत ढकलण्यात आले की तिने आत्महत्या केली, याबाबतचा संभ्रम कायमच होता. तो मृतदेह सामाजिक संघटनेच्या कार्यकर्तीचा असल्याची चर्चा सायंकाळपासून सुरू झाली. ज्या तरुणीचा हा मृतदेह असल्याचा दावा करण्यात आला आहे, तिची दुचाकी इर्विन चौकात तीन दिवसांपासून बेवारस पडली असून, तिचे दोन्ही मोबाईल क्रमांक बंद आहेत. हा घटनाक्रम लक्षात घेता त्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांनी दिली.विहिरीजवळच देहविक्रय व्यवसाय ?एक्स्प्रेस हायवे स्थित टोलनाक्याजवळील विहिरीजवळ एक छोटी पडकी खोली आहे. त्या खोलीत देह व्यवसाय चालत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांना शुक्रवारी केला. या खोलीत कंडोमचा ढिगारा आढळून आल्याने त्या आरोपाला बळ मिळाले आहे. रात्री या ठिकाणी तरुण-तरुणी अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप आहे.‘तो’ मृतदेह सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा?दरम्यान विहिरीमध्ये आढळलेला ‘तो’ मृतदेह शहरातील एका सामाजिक संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्याचा असल्याची चर्चा उशिरा रात्रीपर्यंत होती. ‘त्या’ पदाधिकारी महिलेच्या आई-वडिलांनीही शवविच्छेदनगृहात धाव घेऊन ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. तथापि, उशिरा रात्रीपर्यंत पोलिसांनी ‘त्या’ ओळखीला दुजोरा दिला नाही.