शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

वनाधिकाऱ्यांच्या बंगल्यांना झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:30 IST

वनांचे संरक्षण करणाऱ्यां वनकर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दैनावस्था असतानाच दुसरीकडे मात्र, वनविभागातील आयएफएस अधिकाऱ्यांची निवासस्थाने आणि वनविश्रामगृहांवर अनावश्यक निधी खर्च केला जात आहे.

ठळक मुद्देदरवर्षी लाखोंची उधळपट्टी : वनकर्मचाऱ्यांच्या वसाहतीकडे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतअमरावती : वनांचे संरक्षण करणाऱ्यां वनकर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दैनावस्था असतानाच दुसरीकडे मात्र, वनविभागातील आयएफएस अधिकाऱ्यांची निवासस्थाने आणि वनविश्रामगृहांवर अनावश्यक निधी खर्च केला जात आहे.राज्यात वनरक्षकांची ९४६१ पदे असून सुमारे यामध्ये अनेक वनरक्षक हे प्रादेशिक व वन्यजीव विभागात कार्यरत आहेत. जंगल संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी असल्याने इतर विभागातील कर्मचाºयांप्रमाणे वनरक्षक-वनपालांना ‘अप-डाऊन’ करणे शक्य नसते. राज्यातील प्रादेशिक किंवा वन्यजीव विभागात काम करणाºया वनकर्मचाºयांना दर्जेदार निवासस्थाने नाहीत.मेळघाटमध्ये सिपना व गुगामल, अकोट तर प्रादेशिकच्या पूर्व व पश्चिम मेळघाट वनविभागात वनरक्षक, वनपालांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. वर्षानुवर्षे आणि क्षतिग्रस्त झालेल्या इमारतीत राहून वनरक्षक, वनपाल कर्तव्य बजावताना दिसून येतात. अनेक ठिकाणी शासकीय इमारत जीर्ण अवस्थेत असताना वनकर्मचाऱ्यांना राहण्यायोग्य सुविधा दिल्या जात नाहीत. वनविभागात वनरक्षक ते उपवनसंरक्षक या पदांपर्यंत निवासस्थानांची श्रेणी ठरवलेली आहे. मात्र, नेहमी वनरक्षक, वनपाल या पदांच्या निवासस्थानांकडे वरिष्ठ वनाधिकारी दुर्लक्ष करतात. दुसरीकडे जंगलातील वनविश्राम गृहे सुसज्ज ठेवली जातात कारण वरिष्ठ वनाधिकारी दौऱ्यावर आले की, त्यांना लक्झरी व्यवस्था वनविश्रामगृहात दिली जाते. ब्रिटिशकालीन वनविश्रामगृहात ब्रिटिश ‘कल्चर’ आजही जोपासली जाते.बड्यांच्या निवासस्थानाला चकाकीमुख्यवनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव विभाग यांच्या निवासस्थानाला चकाकी आली आहे. हे बंगले बघितले की डोळे विस्फारून जातात. दोन्ही सीसीएफ, उपवनसंरक्षकांनी बंगल्यावर मनसोक्त खर्च करून हिरवळ निर्माण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरवर्षी त्यांच्या निवासस्थानांच्या डागडुजीवर लाखो रूपयांची उधळपट्टी केली जाते. पावसाळ्यात बंगल्याचा रंग गेला की मार्चमध्ये दुसरा रंग दिला जातो. सामाजिक वनिकरण विभागाचे वनसंरक्षक तर पूर्व व पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षकांची निवासस्थाने खुणावणारी अशीच आहेत. राज्यात बहुतांश आयएफएस अधिकाऱ्यांचे निवासस्थान दरवर्षी लाखो रूपयांनी न्हाऊन निघत असल्याचे सत्य नाकारता येणार नाही.वनकर्मचारी वसाहत डागडुजीचे प्रस्ताव ‘जैसे थे’जिल्ह्यात वनकर्मचाऱ्यांच्या वसाहती डागडुजीचे प्रस्ताव आजही ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे वरिष्ठांना वनकर्मचाऱ्यांबाबत किती जिव्हाळा आहे, हे स्पष्ट होते. मात्र, वरिष्ठ वनाधिकारी ज्या बंगल्यात वास्तव्यास असतात, त्या बंगल्यात कोणत्याही सुविधेच्या उणिवा असू नये, यासाठी ते संपूर्ण वनविभाग डोक्यावर घेतात. परंतु, ही तळमळ वनकर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाबाबत का घेत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे वरिष्ठ वनाधिकारी त्यांच्या बंगल्यांच्या सुरक्षिततेसाठी चार ते पाच वनमजुर त्यांच्या दिमतीला असतात, हे वास्तव आहे.