शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदाता हाच खरा हीरो ! रक्तदानाचा आगाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 05:00 IST

श्रध्देय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींच्या प्रतिमेला गुलाबपुष्प वाहून रक्तदान कार्यक्रमाचा मान्यवरांनी आगाज केला. रक्तदान करणे हे पोलिसांचे कल्चरच. ती संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी पोलीस यंत्रणा ‘लोकमत’ सोबत असल्याचे आयजी मीना म्हणाले. रक्तदानासाठी लोक समोर आल्यास रक्ताच्या काळाबाजाराला आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  संचालन सहायक वितरण व्यवस्थापक रवींद्र खांडे यांनी केले. 

ठळक मुद्देआयजी चंद्रकिशोर मीना : शहर, जिल्ह्यात ‘लोकमत रक्ताचं नातं’ अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस खात्यात असताना माणसांचे जीव वाचविण्यासाठी आम्ही धावपळ करतो. रक्ताची तजवीज करतो. तेव्हा प्राण वाचविणारे ते रक्त कुणाचे, हे माहीत नसते. रक्तदाताही माहीत नसतो. सबब, रक्तदान हे परमदान तथा रक्तदाता हा समाजाचा खरा हिरो असल्याचे प्रतिपादन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी येथे केले. त्यांनी ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रध्देय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती. ते औचित्य साधून ‘लोकमत’च्या अमरावती कार्यालयात शुक्रवारी ‘लोकमत  रक्ताचं, नातं’ या रक्तदान शिबिराचा आगाज करण्यात आला. त्याप्रसंगी मीना बोलत होते. यावेळी झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, सीएस डॉ. श्यामसुंदर निकम, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे, विक्रम टी प्रोसेसरचे जिल्हा व्यवस्थापक प्रसाद पांढरीकर, ‘लोकमत’च्या अमरावती युनिटचे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, संपादकीय प्रमुख गजानन चोपडे, हॅलो हेड गणेश वासनिक, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी सुनील चौरसिया उपस्थित होते. श्रध्देय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींच्या प्रतिमेला गुलाबपुष्प वाहून रक्तदान कार्यक्रमाचा मान्यवरांनी आगाज केला. रक्तदान करणे हे पोलिसांचे कल्चरच. ती संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी पोलीस यंत्रणा ‘लोकमत’ सोबत असल्याचे आयजी मीना म्हणाले. रक्तदानासाठी लोक समोर आल्यास रक्ताच्या काळाबाजाराला आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  संचालन सहायक वितरण व्यवस्थापक रवींद्र खांडे यांनी केले. 

महावितरणचे सहकार्यकोरोनात महावितरणने ६ हजार रक्तपिशव्यांचे संकलन केले. हिच सामाजिक बांधीलकी जोपासत ‘लोकमत’ परिवाराकडून सुरू करण्यात आलेल्या रक्तदान महायज्ञाला महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांनी शुभेच्छा दिल्या. 

कोरोनाकाळात अधिक गरज : राज्य कोरोना संक्रमणातून हळूहळू बाहेर येत आहे. मात्र, दीड वर्षात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे कोविड काळात रक्तसंकलन अगत्याची बाब आहे. ‘लोकमत’ने त्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य असल्याचे मत अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी व्यक्त केले. हा महायज्ञ यशस्वी होईलच, तथापि, लोकमतने भविष्यातदेखील रक्तदान चळवळ राबवावी, असे सीईओ अविश्यांत पंडा म्हणाले.

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट