लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकमत वृत्तपत्र समूह व संत गाडगेबाबा रक्तपेढी अँड कम्पोनंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत ‘लोकमत’ कार्यालय व वरूड येथील ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवती, नागरिक, सेवाभावी संस्था, शासकीय खाजगी संस्था, समाजसेवक, सामाजिक-राजकीय कार्यकर्ता, युवा नेक्स्ट व सखी मंच सदस्य रक्तदान शिबिरात सहभागी होऊ शकतात. प्रत्येक रक्तदात्याला रक्तदाता कार्ड, रक्तदान प्रमाणपत्र देण्यात येईल. या रक्तदान अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमत समूहातर्फे करण्यात आले आहे. या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन गोरगरीब रुग्णांना रक्तपुरवठा उपलब्ध करून देण्याची संधी चालून आलेली आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे ९९२२४२७७९४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.रक्तदाता संघाचे आयोजनवरुड : श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघ आणि लोकमत परिवार, सखी मंच, वरुड यांच्यावतीने २ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन स्थानिक ग्रामीण रुग्णालयात सकाळी १० ते २ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन रक्तदाता संघ व ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९२२९३७६०२ या क्रमांकावर संपर्क करावा.
बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 01:23 IST
लोकमत वृत्तपत्र समूह व संत गाडगेबाबा रक्तपेढी अँड कम्पोनंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत ...
बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान
ठळक मुद्दे‘लोकमत’चा सामाजिक उपक्रम : सहभागी होण्याचे आवाहन