शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

३० ऑगस्टला ‘ब्लॅक मून’चा योग; मराठी विज्ञान परिषदेची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 20:19 IST

‘ब्लड मून’, ‘सुपर मून’, ‘ब्ल्यू मून’ ऐकलेले असेलच, आता ‘ब्लॅक मून’ ही संकल्पना समोर आली असून, ३० ऑगस्ट रोजी ही घटना देशवासीयांना अनुभवता येणार आहे. 

अमरावती : ‘ब्लड मून’, ‘सुपर मून’, ‘ब्ल्यू मून’ ऐकलेले असेलच, आता ‘ब्लॅक मून’ ही संकल्पना समोर आली असून, ३० ऑगस्ट रोजी ही घटना देशवासीयांना अनुभवता येणार आहे.  ‘ब्लॅक मून’ अर्थात काळा चंद्र म्हणजे अमावास्या. परंतु काळा चंद्र म्हणून पात्र होण्यासाठी महिन्यातील दुसरी अमावास्या असावी लागते. जेव्हा इंग्रजी महिन्यात दोन अमावास्या येतात तेव्हा दुस-या अमावस्येच्या चंद्राला ‘काळा चंद्र’ म्हणण्याचा प्रघात आहे.चंद्र हा पृथ्वीमोवती २७.५ दिवसांत एक फेरी पूर्ण करतो. परंतु एका अमावस्येपासून दुस-या अमावस्येपर्यंतचे व एका पौर्णिमेपासून दुस-या पौर्णिमेपर्यंतचे अंतर हे २९.५ दिवसांचे असते. त्यामुळे इंग्रजी महिना ३१ दिवसांचा असेल व पहिली अमावस्या १ तारखेला आली असेल, तर दुसरी अमावस्या ही ३० तारखेला येते. अशा त-हेने एका महिन्यात दोन अमावस्या येतात. याचप्रमाणे दोन पौर्णिमाही येतात. जेव्हा इंग्रजी कॅलेंडरच्या एका महिन्यात दोन पौर्णिमा येतात तेव्हा दुस-या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ म्हटले जाते. अमावस्येला सूर्याचा प्रकाश चंद्राच्या मागे असतो. अंधारी बाजू पृथ्वीकडे असते. ३० ऑगस्टला उगाचच काळा चंद्र शोधण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती येथील खगोलशास्त्र शाखाप्रमुख रवींद्र खराबे व प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे. ------------नवीन प्रघात‘ब्लॅक मून’ म्हणण्याचा प्रघात अलीकडे पडला आहे. यापूर्वी ही घटना ३० जुलै २०११, ३० जानेवारी २०१४ व ३० जानेवारी २०१६ मध्ये घडली. आता यापुढे हा योग ३० मे २०२२ ला येणार आहे. अशा घटना आल्या की, वेगवेगळया अफवा समाजात पसरविल्या जातात. तथापि, अशा कोणत्याच घटनेचा परिणाम पृथ्वीवर तथा मानवी जीवनावर होत नसतो.  ३० ऑगस्टचा चंद्र नेहमीसारखाच असेल. यावेळी चंद्रामध्ये कोणताच बदल होणार नाही. सूर्यग्रहणाची स्थिती वगळता, अमावस्येचा कोणताच चंद्र आपणाला दिसत नाही.