शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची वळवळ शेणातील किड्याप्रमाणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 11:13 IST

शेणातील किडा कसा शेणातच वळवळतो, तसे आता भाजपचे झाले आहे अशा शब्दांत प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव यशोमती ठाकूर यांनी भाजपजनांचा समाचार घेतला आहे.

ठळक मुद्देनाठाळाच्या माथी काठी हाणायची कशी, ते जाणतो

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेणातील किडा कसा शेणातच वळवळतो, तसे आता भाजपचे झाले आहे. केंद्रात इतकी मोठी सत्ता प्राप्त झाली असताना त्यांना हाव मात्र राज्यात बहुमतात असलेल्या सत्तेत खोडा घालण्याची आहे, अशा शब्दांत प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव यशोमती ठाकूर यांनी भाजपजनांचा समाचार घेतला आहे. यशोमती ठाकूर या राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्रीदेखील आहेत, त्यांनी शुक्रवारी लोकमतशी संवाद साधला.

कुणी आमचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, कुणी पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला, तर त्याला आम्ही चांगलेच बदडू. आम्ही गांधीवादी आहोत, हे खरे आहे; परंतु आम्ही तुकाराम महाराजांचीही शिकवण शिकलेलो आहोत.नाठाळाच्या डोक्यावर काठी कशी हाणायची, हे आम्हाला उत्तमरीत्या ज्ञात आहे. तुमची गाठ आमच्याशी आहे. यशोमतीशी आहे, हे याद राखा, असा दम यशोमती ठाकूर यांनी भाजपजनांना भरला.- तर भूकंप होईल!महाराष्ट्रातील सरकार स्थिर आहे. महाराष्ट्राने देशाला नवा फॉर्म्यूला दिला आहे. माजी मुख्यमंत्री ज्यांना सोबत घेऊन फिरताहेत, ते बाहेरून आलेले लोक आहेत. यातून ते लोक किती कमजोर आणि त्यांचा पक्ष किती दुर्बल झाला आहे, हे लक्षात यावे. भाजपच्या १०५ आमदारांमध्ये आमचे किती लोक तिकडे गेले आहेत आणि ते कधी आमच्यात परत येतील, याची तुम्ही काय गॅरंटी घेऊ शकता, असा सवाल त्यांनी भाजपला उद्देशून केला. कोण-कोण लोक आमच्या संपर्कात आहेत, हे तुम्हाला कळले ना, तर मोठा भूकंप होईल, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर