नगरपालिका निवडणूक : मुख्यमंत्र्यांनी दिला विजयाचा मंत्रअमरावती : लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर भाजप राज्यात क्रमांक १ चा पक्ष झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. त्याअनुषंगाने येत्या नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी थेट भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नगरपरिषद निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी त्यांनी ‘मायक्रो प्लँनिंग’च्या टिप्स दिल्यात.येथील एका हॉटेलमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षस्थानी पश्चिम विदर्भातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी नगरपरिषद निवडणुकीसाठी रावसाहेब दानवे यांनी जिल्हानिहाय आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांची मते जाणली. न.प. निवडणूक लढताना भाजपला ताकदीनिशी मैदानात उतरावे लागेल. परंतु मंचावरील नेत्यांनी नगरपरिषदेची निवडणूक काबीज करताना अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघावरही भाजपचा विजय कायम ठेवण्याचे सुक्ष्म नियोजन करण्यात कोणतीही उणिवा ठेवली नाही. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी नगरपरिषद निवडणूक ही स्वबळावर लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. मात्र काही ठिकाणी फायदा होत असेल तर अपवादात्मक युती करण्यास हरकत नाही. परंतु हा निर्णय जिल्ह्यातील नेत्यांना घ्यावा लागेल, ही बाब त्यांनी स्पष्ट केली. ‘कमळ’ लोकांपर्यत पोहोचवा. नगराध्यक्ष थेट निवडून आणण्यासाठी पक्ष ताकद लावणारच पण आमदारांनी पहेलवानासारखे आखाड्यात उतरावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. यावेळी मंचावर राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, पालकमंत्री प्रवीण पोटे, ना. मदन येरावार, ना. रणजित पाटील, आ.संजय कुटे, रवींद्र भुसारी, उपेंद्र कोठेकर, अरुण अडसड, श्रीकांत भारतीय, आ. राजेंद्र पाटनी, आ. राजू तोडसाम, आ. आकाश फुंडकर, आ. अनिल बोंडे, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. रमेश बुंदिले, शिवराय कुळकर्णी, दिनेश सूर्यवंशी, जयंत डेहनकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘पदवीधर’ नोंदणीबाबत मुख्यमंत्री नाराजअमरावती विभाग पदवीधर मतदार संघाचे सदस्य गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार नव्याने मतदार नोंदणी केली जात आहे. मात्र अमरावती विभाग ‘पदवीधर’ नोंदणीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला असता त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. नोंदणीची स्थिती समाधानकारक नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. भाजप मंडळ स्तरावर १०० अर्जाची नोंदणी झाली नाही. आता १० दिवसात परिस्थिती सुधारा, असे ते म्हणाले. विधान परिषदेत भाजपचे बहुमत वाढविण्यासाठी अमरावती पदवीधर मतदार संघ काबीज करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.अचलपूर, चांदूरबाजार नगराध्यक्षांचा भाजपत प्रवेशमुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आदींच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी भाजपत प्रवेश केला. यात चांदुरबाजारच्या नगराध्यक्ष मनिषा नांगलिया, अचलपूरचे नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी, अचपूरचे माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवीदास वानखडे, शेंदुरजनाघाटचे माजी नगराध्यक्ष प्रशांत सावरकर आदींचा समावेश आहे.
भाजपाचे ‘मायक्रो प्लॅनिंग’
By admin | Updated: October 21, 2016 00:16 IST