शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

शेतात भाजपचे झेंडे लावावे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:03 IST

जिल्ह्यातील आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३७ हजार शेतकऱ्यांची तूर घरी पडून आहे. ज्यांनी विकली, त्या शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून चुकारे नाहीत. बोंडअळीची मदत व पीक विमा भरपाईतून बँका कर्जकपात करीत असल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. आता खरिपाला सुरूवात होत असल्याने उद्या पाऊस पडल्यास शेतात भाजपचे झेंडे लावायचे का, असा सवाल आ. बच्चू कडू यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना मंगळवारी केला.

ठळक मुद्देबच्चू कडूंचा सवाल : तूर, हरभरा खरेदी, चुकाऱ्यासाठी पालकमंत्र्यांच्या घरासमोर डेरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३७ हजार शेतकऱ्यांची तूर घरी पडून आहे. ज्यांनी विकली, त्या शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून चुकारे नाहीत. बोंडअळीची मदत व पीक विमा भरपाईतून बँका कर्जकपात करीत असल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. आता खरिपाला सुरूवात होत असल्याने उद्या पाऊस पडल्यास शेतात भाजपचे झेंडे लावायचे का, असा सवाल आ. बच्चू कडू यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना मंगळवारी केला.तूर खरेदी केंदे्र तातडीने सुरू करून शेतकऱ्यांची तूर व हरभरा तातडीने खरेदी करा आणि चुकारे तसेच बोंडअळीचा मदतनिधी दिवसभरात द्या, यांसह इतर मागण्यासाठी आ. बच्चू कडू यांनी मंगळवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या राठीनगरातील घरासमोर डेरा आंदोलन केले. जोवर मागण्या मान्य होणार नाहीत, तोवर येथून हलणार नाही, असे जिल्हा प्रशासनाला ठणकावून सांगितल्याने प्रसासनासह पोलीस विभागाची गोची झाली. दरम्यान, पालकमंत्री व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आंदोलनस्थळी येऊन उपस्थितांची भेट घेवून मागण्या समजवून घेतल्या तसेच यासंदर्भात राज्याच्या अर्थमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.पोलिसांना दिला चकमा‘पोटे परिवार’ असे खासगी वाहनावर लिहून, सोबत नवरदेवदेखील तयार ठेवून १० ते १२ ट्रॅव्हल्सने आंदोलक पोटे यांचे निवासस्थानी आले. येथेच पोलिसांची फसगत झाली. पालकमंत्र्यांकडचे पाहुणे समजून त्यांना प्रवेश देण्यात आला.’त्या’ बँक व्यवस्थापकावर गुन्हाशेतकºयांना मिळालेल्या पीक विमा व बोंड अळीसाठीच्या नुकसान भरपाईमधून बँकांद्वारा कर्जकपात करण्यात येत असल्याचा आरोप आ. कडू यांनी करताच, ‘त्या’ बँकांच्या संबंधित व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करू, असे जिल्हाधिकारी म्हणाले.घोषणाबाजीला फाटाआंदोलनस्थळी शेकडे महिला-पुरुष असताना शासनाच्या निषेधाची एकही घोषना देण्यात आली नाही. याऐवजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजने म्हणण्यात आली. यामध्ये आ. बच्चू कडूदेखील सहभागी झाले. शांततेच्या मार्गाने आंदोलन झाले.अडचणीतील शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात येत आहे. तुरीच्या चुकारे व खरेदीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. लवकरच तूर खरेदी करण्यात येऊन त्वरित चुकारे दिले जातील.- प्रवीण पोटे, पालकमंत्रीगारपीट, पीक विमा व बोंडअळीच्या मदतनिधीतून कर्जकपात करण्यात येऊ नये, अशा सूचना सर्व बँकांना यापूर्वीच देण्यात आल्यात. असा प्रकार घडला असल्यास त्याची गंभीर दखल घेऊ.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी