शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जन्म न् कर्मभूमीत ग्रामजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिन मंगळवारी ग्रामजयंती म्हणून सोत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने लक्षवेधी शोभायात्रा काढण्यात आली. मंगळवारी पहाटे ५ वाजता महासमाधीवर दिव्यांचा झगमगाट करण्यात आला. सामुदायिक ध्यानादरम्यान दामोदर पाटील यांचे चिंतन झाले.

ठळक मुद्देराष्ट्रसंतांचा जन्मावतरण सोहळा : हजारो अनुयायांची उपस्थिती, भव्य शोभायात्रा

तिवसा/ गुरुकुंज (मोझरी) :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिन मंगळवारी ग्रामजयंती म्हणून सोत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने लक्षवेधी शोभायात्रा काढण्यात आली. मंगळवारी पहाटे ५ वाजता महासमाधीवर दिव्यांचा झगमगाट करण्यात आला. सामुदायिक ध्यानादरम्यान दामोदर पाटील यांचे चिंतन झाले. त्यानंतर गुरुदेवनगर येथून शोभायात्रा काढण्यात आली. महोत्सवादरम्यान गोपाळकाला कीर्तन झाले. शेतकरी दिलिपराव तिखे, भीमराव वसू, श्रीधर बायस्कर, राजेंद्र घोगरे, धनराज केने,कांचन धनराज बारबुद्धे यांचा शाल-श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भारतीय सेनेत कर्तव्यावर असलेल्या असिस्टंट कमांडन्ट चेतन शेलोटकर व श्रीकांत प्रधान यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या मातापित्यांचा शाल-श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, सरचिटणीस जनार्दन बोथे, प्रचारप्रमुख दामोदर पाटील, कार्यकारणी सदस्य दिलीप कोहळे, भानुदास कराळे, विलासराव साबळे, रायजीप्रभू शेलोटकर आदी उपस्थित होते. संचालन उद्धवराव वानखडे यांनी केले. ग्रामजयंती समितीच्यावतीने महाप्रसाद वितरित करण्यात आला. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.यावली शहीद : सुमधुर संगीत, लखलख पणत्यांचा मंद प्रकाश, घरासमोर काढलेली रांगोळी, पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट, शंखाचा निनाद अन् हजारो गुरुदेवभक्तांच्या साक्षीने मंगळवारी भल्या पहाटे पाळणा हलला अन् संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मावतरण सोहळा अनुभवण्याचे भाग्य हजारो अनुयायांना लाभले. मंगळवारी पहाटे साडेचार वाजता जन्मावतरण पुष्पांजली सोहळ्याला सुरुवात झाली. ग्रामस्थांसह हजारो भक्तांनी या अभूतपूर्व सोहळ्याला उपस्थिती लावली. तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर या कुटुंबासह जन्मावतरण सोहळ्यात सहभागी झाल्या.राष्ट्रसंतांची जन्मभूमी असलेल्या यावली शहीद गावात जन्मोत्सव सोहळ्यापूर्वी भल्या पहाटे गावातील गल्ली न गल्ली स्वच्छ करण्यात आली. गल्लीबोळातील अंधार नाहीसा होऊन जणू या गावात आज दिवाळी असल्याचा प्रत्यय प्रत्येकाला येत होता. प्रत्येक घराच्या उंबरठ्यावरील पणत्यांच्या प्रकाशात संपूर्ण यावली गाव न्हाऊन निघाले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांनी ग्रामस्थ व गुरुदेवभक्तांना मंत्रमुग्ध केले.जन्मोत्सवानंतर सामुदायिक ध्यान व आरती झाली. त्यानंतर गावातून पालख्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावलीकरांचे आदरातिथ्य पाहून पालखी व पदयात्रेकरूही भारावून गेले होते. यानिमित्त राज्यभरातून भाविकांनी हजेरी लावली होती. यावली शहीद ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाºया राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मावतरण सोहळा अमरावती तालुक्यातील यावली शहीद या जन्मभूमीत, तर तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी या कर्मभूमीत ‘ग्रामजयंती’ साजरी झाली. दोन्ही गावांनी दिवाळी अनुभवली. गावा गावाशी जागवा, भेदभाव हा समूह मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे.. या राष्टÑसंतांच्या शिकवणीचा जागर करत हजारो अनुयायी त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले.