अमरावती : यंदा प्रथमच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता सर्व बाबाप्रेमींनी घरी राहूनच अवतार मेहेरबाबांचा जन्मोत्सव केक कापून व बाबांचा जयजयकारात साजरा केला. यंदा जिल्ह्यात अवतार मेहेरबाबा आध्यात्मिक केंद्रातील जन्मोत्सवाचा कार्यक्रम जाहीरपणे रद्द करण्यात आले होेते.
यावर्षी केंद्रात कुणी येऊ नये, घरी राहूनच प्रियतम अवतार मेहेरबाबांचा जन्मोत्सव साजरा करण्याच्या सूचना अमरावती, दर्यापूर, परतवाडा इतर आध्यात्मिक केंद्राच्या अध्यक्ष व सचिवांनी बाबाप्रेमींना दिल्या होत्या. त्यामुळे यंदा केंद्रातील जन्मोत्सव सोहळा स्थगित करण्यात आला. २५ फेब्रवारीला गुरुवारी पहाटे ५ वाजता मेहेरबाबांचा जन्मोत्सव घराघरांत बाबाप्रेमींनी उत्सहात साजरा केला. घराघरांत अवतार मेहेरबाबांच्या प्रतिमेचा पाळणा हलला. यावेळी मेहेरबाबांची आरती करण्यात आली. यंदा प्रभात रॅली व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.