शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

घरभाडे भत्ताप्रकरणी कोट्यवधींची फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांसह ज्या कर्मचाऱ्यांचा थेट जनतेशी संबंध येतो, अशा कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे शासनाकडून बंधनकारक केले आहे. यात ग्रामसेवकांचा समावेश आहे. घरभाडे भत्त्याची उचल करण्याकरिता शासनाच्या ९ सप्टेंबर २०१९ रोजीच्या परिपत्रकानुसार ग्रामसभेचा ठराव असणे बंधनकारक आहे. असे न केल्यास त्यांना घरभाडे भत्ता देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, कृषिसेवक व आरोग्यसेवक मुख्यालयी राहत नसल्याची माहिती अधिकारातून उघड झाली आहे. 

ठळक मुद्देपोलिसांत तक्रार, जिल्हाधिकारी, सीईओंसह ३६८ कर्मचाऱ्यांची व्हावी चौकशी

  लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : खोटी कागदपत्रे जोडून घरभाडे भत्याची उचल करून शासनाची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह त्यांना सहकार्य करणाऱ्या  जिल्हाधिकारी व अन्य ३६८ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार चांदूर बाजार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. यासंबंधाने ठाणेदारांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह ज्या कर्मचाऱ्यांचा थेट जनतेशी संबंध येतो, अशा कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे शासनाकडून बंधनकारक केले आहे. यात ग्रामसेवकांचा समावेश आहे. घरभाडे भत्त्याची उचल करण्याकरिता शासनाच्या ९ सप्टेंबर २०१९ रोजीच्या परिपत्रकानुसार ग्रामसभेचा ठराव असणे बंधनकारक आहे. असे न केल्यास त्यांना घरभाडे भत्ता देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, कृषिसेवक व आरोग्यसेवक मुख्यालयी राहत नसल्याची माहिती अधिकारातून उघड झाली आहे. तालुक्यात ४० ग्रामसेवक कार्यरत आहेत. या ग्रामसेवकांपैकी ११ ग्रामसेवकांनी घरभाड्याच्या बनावट पावत्या लावून, घरभाडे भत्ता वसूल केला. उर्वरित २९ ग्रामसेवकांनी कोणत्याही प्रकारचा लेखी पुरावा न घेता स्थानिक गटविकास अधिकाऱ्यांकडून घरभाडे भत्ता अदा करण्यात आला. तक्रारीवर अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नसल्याने चांदूर बाजार पोलिसांत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, चांदूर बाजार तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांसह तालुक्यातील २८९ जिल्हा परिषद शिक्षक, ४२ ग्रामसेवक व ३७ तलाठ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यानंतरही गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात जाणार असल्याची माहिती लोकविकास संघटनेचे गोपाल भालेराव व त्यांचे वकील मनीष मोडक यांनी पत्रकार परिषदेत दिली.चांदूरबाजार तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच ही लालफितशाही शिरली असून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी, संबंधितांवर दंड उगारावा, अशी मागणी करण्यात आली आहे.  

ग्रामसेवकांनी जोडल्या बनावट पावत्याचांदूर बाजार तालुक्यातील ग्रामसेवकांना महिन्याकाठी १ लाख २५ हजार रुपये घरभाडे भत्ता मिळतो. त्यातील ११ ग्रामसेवकांनी घरभाडे भत्ता उचल करण्याकरिता ज्या घरमालकांच्या पावत्या लावल्या, त्या सर्व बनावट असून, ग्रामसेवकांनी स्वत: तयार केल्या आहेत. त्यावर असलेल्या घरमालकांची स्वाक्षरीसुद्धा बनावट आहे. यामुळे शासनाच्या निधीतून करण्यात आलेल्या अपहार व फसवणुकीत सदर कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी यांचे संगनमत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला आहे.

गोपाल भालेराव यांची तक्रार प्राप्त झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. तक्रारातील रक्कम अधिक व प्रकरण आर्थिक फसवणुकीसंदर्भात असल्याने पुढील चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात येणार आहे. याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊ. - सुनील किनगे, ठाणेदार, चांदूर बाजार

 

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारी