शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या ‘कॅश क्रॉप’ला मोल मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला हा कापूस पट्टा म्हणून ओळखला जातो. ‘पांढरे सोने’ म्हणून परिचित असलेल्या या पिकाला  जिल्ह्यात ‘कॅश क्रॉप’ संबोधले जाते. कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खतांच्या किमतीत व मजुरीत भरमसाठ वाढ झाल्याने कापसाला मिळणारा सहा हजार रुपये प्रतिक्विंटल दरदेखील परवडणारा नाही.

ठळक मुद्देकापूस घरातच : अंगाला खाज सुटण्याचा प्रकार वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा बाजार : तीन महिन्यांपासून भाववाढ न झाल्याने शेतकऱ्यांच्या घरात शेकडो क्विंटल कापूस विक्रीविना घरात पडून आहे. परिणामी, अंगाला खाज सुटत असल्याने कुटुंबातील सदस्य कापूस विकण्यासाठी कुटुंबप्रमुखाकडे तगादा लावत आहे.विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला हा कापूस पट्टा म्हणून ओळखला जातो. ‘पांढरे सोने’ म्हणून परिचित असलेल्या या पिकाला  जिल्ह्यात ‘कॅश क्रॉप’ संबोधले जाते. कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खतांच्या किमतीत व मजुरीत भरमसाठ वाढ झाल्याने कापसाला मिळणारा सहा हजार रुपये प्रतिक्विंटल दरदेखील परवडणारा नाही.  एकदम रोखीने पैसे येत असल्याने संपूर्ण कापूस एकाच वेळी विकण्यासाठी शेतकरी  उत्सुक असतात. गतवर्षी कापसाचे दर ५१०० ते ५३००  प्रतिक्विंटल असे होते. यावर्षी गेल्या तीन महिन्यांपासून कापूस ५९०० ते सहा हजारांवर स्थिर आहेत. मार्च उलटूनही भाव वाढले नाही. कापूस निघून आता सहा महिने झाले. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे व कापसातील मॉइश्चर कमी होऊन भारमान घटत आहे. त्यातच  कापसाची गंजी लावून जास्त दिवस झाल्याने  कुटुंबातील सदस्यांना खाजेची लागण झाली आहे.  त्यामुळे दर लवकर वाढावेत व कापसाची विक्री व्हावी, अशी सर्वांची अपेक्षा आहे. 

कापूस हंगाम अंतिम टप्प्यातहजारो क्विंटल कापूस घरात पडून असल्याने व भाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. कापूस हंगाम अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनपेक्षाही कापसाला पसंती दिली होती. कापसाचे उत्पादन बोंडअळीमुळे घटले. मात्र, जो उणापुरा कापूस निघाला, तोदेखील चांगल्या दराअभावी घरात पडून आहे.

कापसातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आम्हीघरकाम, लग्न आदी कापसाच्या भरवशावर असते. मार्च संपला की, एप्रिल महिन्यात साधारणपणे भाव वाढ होत असते. मात्र, यंदा कापसाची दरवाढ अद्याप झालेली नाही.- भानुदान भोंडे, शेतकरी, राजुरा बाजार 

कापसाचे भाव हे मुख्यत: सरकी व रुईवर अवलंबून असतात. विदेशात कापसाला मागणी असल्यावर ‘मागणी व पुरवठा’ हा अर्थशास्त्राचा नियम लागू होतो.  त्यावर बरेच काही ठरत असते. याकडे आमचेही लक्ष आहे. - राजेश गांधी, व्यावसायिक

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी