शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

बिल्दोरी पुलाची समस्या निकाली

By admin | Updated: July 24, 2016 00:03 IST

तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर-अंजनसिंगी मार्गावरील बिल्दोरी पुलाची समस्या निकाली निघाली आहे.

वाहतुकीसाठी खुला : एकाच परिवारातील चौघांचा घेतला होता बळीअमरावती : तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर-अंजनसिंगी मार्गावरील बिल्दोरी पुलाची समस्या निकाली निघाली आहे. या आठवड्यात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या नाल्यावर पूल नसल्याने ४ आॅगस्ट २०१५ रोजी नाल्याच्या पुरात यवतमाळ येथील आजनकर परिवारातील ४ जणांचा बळी गेला. तत्कालीन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर व आ. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे ही समस्या मार्गी लागली आहे. गतवर्षी ५ व ६ आॅगस्ट रोजी जिल्ह्यासह तिवसा तालुक्यात अतिवृष्टी झाली होती व उर्ध्व वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीला पूर आला होता. त्यात हा अपघात घडला होता.युद्धस्तरावर कामाचे आदेशअमरावती : असलेला बिल्दोरी नाल्याचे पाणी थोपविल्यामुळे कौंडण्यपूर ते अंजनसिंगी हा मार्ग बंद होता. ६ आॅगस्ट रोजी वळणावर व खोलगट भागात असलेल्या या नाल्यावरील पुलावर किती पाणी आहे याचा अंदाज न आल्यामुळे यवतमाळ येथून आर्वी येथे लग्नाला निघालेल्या आजनकर परिवारातील ४ सदस्य असलेली कार ६ आॅगस्टला पुरात फसली व यामध्ये सर्वांचा दुर्दैवी अंत झाला होता. ‘हे तर प्रशासनाचेच नरबळी’ या अर्थाने ‘लोकमत’ने ही समस्या लावून धरली होती. तत्कालीन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी ही जीवघेणी समस्या गांभीर्याने घेऊन या पुलासाठी निधी तत्काळ उपलब्ध करण्याचे आदेश सिंचन महामंडळाला व त्वरीत निविदा काढण्याचे आदेश विशेष प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला दिले होते. या कामाचा कार्यारंभ २९ आॅक्टोबर २०१५ रोजी काढण्यात आला व आठ महिन्याच्या अवधीत हे काम पूर्ण करण्यात आले. मुख्य अभियंता सी. व्ही. लुंगे यांनी सातत्याने या कामाचा आढावा घेतला. कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, उपअभियंता दिनकर माहुरे यांच्या मार्गदर्शनात ५ कोटी १४ लाख रुपयांच्या या भव्य पुलाचे काम अल्पावधीत पूर्ण करण्यात आले व हा पूल नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. युद्धस्तरावर काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेशएकाच परिवारातील चार निष्पापांचा बळी घेणाऱ्या या बिल्दोरी पुलाचे काम युद्धस्तर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश होते. पालकमंत्री प्रवीण पोटे व आ. यशोमती ठाकूर यांनीदेखील ही समस्या मार्गी लागावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर ९ महिन्यांच्या कालावधीत ही समस्या मार्गी लागली आहे. चार व्यक्तींचा करूण अंत होणे ही दुर्दैवी घटना होती. असे प्रसंग पुन्हा घडू नयेत यासाठी स्वत: जातीने लक्ष घातले. प्रशासनाच्या सर्व विभागाच्या मदतीने काम पूर्ण झाले याचा आनंद आहे.- ज्ञानेश्वर राजूरकर,माजी विभागीय आयुक्त.