अधिकारी-कर्मचाऱ्यांना दर बुधवारी सायकल बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 05:00 AM2020-11-10T05:00:00+5:302020-11-10T05:00:07+5:30

महापालिका क्षेत्रात ३१ मार्चपर्यंत ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान राबवण्यिात येत आहे. या अभियान कालावधीत नसिर्गातील पंचतत्त्वाला व मानवी जीवनाला सहकार्याच्या दृष्टीने हे आदेश काढण्यात आलेले आहेत.

Bicycles are mandatory for officers and employees every Wednesday | अधिकारी-कर्मचाऱ्यांना दर बुधवारी सायकल बंधनकारक

अधिकारी-कर्मचाऱ्यांना दर बुधवारी सायकल बंधनकारक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
शहराचे आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने आयुक्तांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दर बुधवारी सायकलने येणे बंधनकारक केले आहे. वाहनाने आल्यास आवारात प्रवेश दिला जाणार नसल्याचे त्यांनी निक्षून बजावले.
महापालिका क्षेत्रात ३१ मार्चपर्यंत ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान राबवण्यिात येत आहे. या अभियान कालावधीत नसिर्गातील पंचतत्त्वाला व मानवी जीवनाला सहकार्याच्या दृष्टीने हे आदेश काढण्यात आलेले आहेत. ही सायकलदेखील यंत्रविरहीत असावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्येकाने आदेशाचे पालन करणे बंधनकारक केले आहे. आरोग्य व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा व अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांसह परिसरातील किमान पाच नागरिकांना याचे महत्त्व पटवून अभियानाची व्याप्ती वाढविण्याविषयी सहकार्य करण्याच्या सूचना या अभियानाचे नोडल अधिकारी तथा सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी स्पष्ट केले.
महापालिका क्षेत्रात २ ऑक्टोबर ते ३१ मार्च दरम्यान प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित व निर्सगासी संबंधित ह्य माझी वसुंधराह्ण अभियान राबविण्यात येत आहे. यात पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वावर आधारित शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


पदाधिकारी, नगरसेवकही सायकलने : महापौर
केवळ प्रशासनच नव्हे, तर महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांनीदेखील दर बुधवारी महापालिकेत सायकलनेच येण्याच्या सूचना महापौर चेतन गावंडे यांनी केल्या. लॉकडाऊन काळात प्रदूषणात मोठी घट झाली होती. सायकलने कोरोना संसर्गाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासदेखील मदत होणार असल्याचे महापौर चेतन गावंडे म्हणाले.

पर्यावरण रक्षण व आरोग्याचे संवर्धनासाठी सायकलने फिरणे महत्त्वाचे आहे. याचसोबत अमरावतीकरांनी एक दिवस सायकलचा अवलंब केल्यास प्रदूषण घटण्यास मदत होईल.
- प्रशांत रोडे
आयुक्त, महापालिका

Web Title: Bicycles are mandatory for officers and employees every Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.