शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपूजनाचा वाद अन्‌ पॉलिटिकल ड्रामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 05:00 IST

तयार करण्यात आलेले फलकही शासकीय नियमानुसार नसल्याचे आमदार अडसड यांनी पालकमंत्र्यांना सांगताच ॲड. यशोमती ठाकूर यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना सुधारित फलक लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर आमदार प्रताप अडसड पुढील कार्यक्रमात सामील झाले. मात्र, यावेळी या घटनाक्रमाच्या अनुषंगाने पॉलिटिकल ड्रामा सुरू झाला तो पालकमंत्र्यांनाही अपेक्षित नव्हता. आमदार प्रताप अडसड आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या समर्थकांनी घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरण तापले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : आजी-माजी आमदारांच्या समर्थकांमध्ये फलक लावण्यावरून आणि श्रेयवादातून जोरदार घोषणाबाजी अन् तू-तू-मै-मै झाली. त्यामुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघातील रस्ते विकासकामांच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम शनिवारी चांगलेच गाजले. तिन्ही तालुक्यांमध्ये हा पॉलिटिकल ड्रामा सुरू होता. दरम्यान, पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मध्यस्थी करीत शासकीय नियमानुसार नव्याने फलक लावण्याचे आदेश दिल्याने हा वाद तात्पुरता शमला. मात्र, प्रत्येक भूमिपूजनस्थळी आजी-माजी आमदारांचे समर्थक घोषणा देत होते. त्यामुळे हे भूमिपूजन शासकीय की राजकीय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.पंतप्रधान, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत धामणगाव रेल्वे मतदारसंघात रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. लोणी येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू असताना धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड समर्थकांसह तेथे पोहोचले. या कार्यक्रमाची आपल्याला कल्पनाही देण्यात आली नव्हती, ही बाब त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. तयार करण्यात आलेले फलकही शासकीय नियमानुसार नसल्याचे आमदार अडसड यांनी पालकमंत्र्यांना सांगताच ॲड. यशोमती ठाकूर यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना सुधारित फलक लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर आमदार प्रताप अडसड पुढील कार्यक्रमात सामील झाले. मात्र, यावेळी या घटनाक्रमाच्या अनुषंगाने पॉलिटिकल ड्रामा सुरू झाला तो पालकमंत्र्यांनाही अपेक्षित नव्हता. आमदार प्रताप अडसड आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या समर्थकांनी घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरण तापले होते. दोन्ही नेत्यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी केली. आपापल्या पक्षांचे झेंडे झळकावले. आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून धरले.  नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तिन्ही तालुक्यात विविध विकासकामांच्या भूमिपूजनावरुन राजकारण तापले असताना प्रशासनाने मात्र चुप्पी साधल्याचे दिसून आले.  तर कार्यकर्ते आक्रमक होते. 

अन् पालकमंत्र्यांनी दाखविले राजकीय सामंजस्यधामणगाव रेल्वे मतदारसंघात शनिवारी विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते घेण्यात आले, मात्र, अनवधानाने आयोजकांकडून आमदार प्रताप अडसड यांचे नाव भूमिपूजन फलकावर टाकण्यात आले नव्हते. ही बाब शासकीय कार्यक्रमात नियमसंगत नाही, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली. त्यामुळे भूमिपूजनाच्या सर्व फलकांवर आमदार प्रताप अडसड यांचे नाव अंकित करून नव्याने फलक लावा, असा पवित्रा ठाकुरांनी घेतला आणि राजकीय सामंजस्य दाखविले. त्यामुळे आजी-माजी आमदार समर्थकांमधील भूमिपूजन फलकाचा वाद थांबला.

शासकीय कार्यक्रम असो वा भूमिपूजन, यात स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलू नये, असा प्रोटोकॉल आहे. तथापि, शनिवारच्या भूमिपूजन कार्यक्रमाची आपणास माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. एवढेच नव्हे तर आमदार म्हणून आपले नाव नव्हते. ही बाब आपण पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी लगेच याची दखल घेतली. आपला पालकमंत्र्यांवर कुठलाही आक्षेप नाही. माजी आमदारांनी राजकीय पोळी शेकण्यासाठी पालकमंत्र्यांना अंधारात ठेवले. - प्रताप अडसड  आमदार, धामणगाव रेल्वे

दोन महिन्यांपूर्वी खासदार व आमदार यांनी पालकमंत्री व जिल्हा परिषद अध्यक्ष यांना न बोलावता परस्पर भूमिपूजन उरकले होते. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता, पालकमंत्र्यांना बोलावून हे भूमिपूजन घ्यावे. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. - वीरेंद्र जगताप, माजी आमदार

सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अशा तीन यंत्रणांच्या विविध कामांचे भूमिपूजन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी धामणगाव मतदारसंघात होते. भूमिपूजनाचे फलक कोणत्याही यंत्रणांनी लावले नाहीत. मात्र, शासकीय नियमानुसार भूमिपूजन फलक लावण्यासंदर्भात पालकमंत्री सूचना देतील, तशी कार्यवाही केली जाईल.आय. आय. खान, कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, अमरावती

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर