शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

भामटा शिक्षक भाडेकरू म्हणून आला अन् कार घेऊन पळाला

By admin | Updated: February 25, 2017 00:15 IST

जुळ्या शहरात दररोज नवनवीन घटना घडत असताना ब्राम्हण सभा कॉलनीत राहण्यास आलेला एक तोतया शिक्षक नगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यालाच चुना लावून गेला.

२० हजार नेले नगदी : परिसरातीलच मुलगा दाखविला स्वत:चापरतवाडा : जुळ्या शहरात दररोज नवनवीन घटना घडत असताना ब्राम्हण सभा कॉलनीत राहण्यास आलेला एक तोतया शिक्षक नगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यालाच चुना लावून गेला. हा प्रकार सोमवारी उघडकीस आला. घर भाड्याने पाहिजे असल्याचे सांगून घरमालकाकडून अगोदर रोख २० हजार रूपये आणि नंतर कार पळवून नेल्याचा संतापजनक मात्र तेवढीच मजेशीर घटना घडली आहे.रणजित विश्वनाथ गावंडे असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. ते शहरातील गर्भश्रीमंत समजल्या जाणाऱ्या ब्राम्हणसभा कॉलनीत राहतात. गत आठवड्यात एक इसम त्यांच्या घरी आला. आपण जिल्हा परिषद शिक्षक असून आपणास खोली भाड्याने पाहिजे असल्याचे रणजित गावंडे यांना सांगितले. गावंडे यांनी तीन खोल्यांचा ब्लॉक त्या नवीन भाडेकरूला दाखविला. त्या भामट्या शिक्षकाने तो पसंद केला. लगेच त्याने नवीन पलंग, एक होम थिएटर भाड्याने घेतलेल्या खोलीत आणून ठेवले आणि राहू लागला. गावंडे यांनी उदार मनाने माणुसकी दाखवित त्या भाडेकरुला जेवण नास्ता करायलासुद्धा बोलाविले. चार-पाच दिवसांत दोघांची चांगली ओळख झाली. सकाळी दोघे मॉर्निंग वॉकला जाऊ लागले. विश्वास संपादन केल्यानंतर त्याने अशी हातचलाखी केल्याची चर्चा परिसरात आहे.२० हजार रुपये नगदीशिक्षक असल्याने जवळचे गाव मिळावे यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना वीस हजार रुपये द्यायचे आहे म्हणून रणजित गावंडे यांना उसनवारीवर मागितले. पत्नी येताच परत देण्याची बतावणी केली. घरमालक गावंडेंनी अडचण पाहता शहरातील एका ज्वेलर्समधून स्वत: उसने घेऊन त्या तोतया शिक्षकाला दिले. कार घेऊन पळाला२० हजार रुपये रोख घेतल्यावर आपण पत्नीला आणायला बडनेराकडे जात असल्याचे या भाडेकरू शिक्षकाने घरमालक रणजित गावंडे यांना सांगितले. गावंडेला अमरावतीला जायचे असल्याने दोघेही अमरावतीला २० फेब्रुवारीला गेले. तेथून बडनेरा रेल्वे स्टेशनवर आले. मात्र गाडीला दोन तास उशीर असल्याचे त्याने सांगितले. वेळ असल्याने दोघेही गावंडे यांच्या किशोरनगर येथील नातेवाईकांकडे आले. तेथे गावंडे आणि त्या शिक्षक पती-पत्नीसाठी स्वयंपाक बनविण्यात आला. तेवढ्यात आपण पत्नीला घेऊन येतो म्हणून गावंडे यांच्या कार क्रमांक एम. एच. २७ व्ही-६५४८ ची चावी मागितली आणि पत्नीला आणायला गेला. रात्र झाली तरी अजूनपर्यंत परतलाच नाही. त्याच्या मोबाईलवर वारंवार संपर्क केला, मात्र संपर्क झाला नाही.पोलिसात गुन्हा दाखलया संपूर्ण प्रकरणाची फिर्याद रणजीत गावंडे यांनी अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला केली. पोलिसांनी भादंविच्या कलम ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास चालविला आहे.मुलगा पण परिसरातीलरणजित गावंडे यांच्या घरी आलेल्या तोतया शिक्षकाने भाड्याने घर पाहण्यासाठी ब्राम्हणसभा कॉलनीतीलच एका लहान मुलास नेऊन स्वत:चा मुलगा असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मुळातच तो फसवणूक करण्यासाठी आल्याचे सिद्ध झाले आहे. या घटनेची परिसरात खमंग चर्चा सुरू आहे.