शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

खबरदार! एकाही कार्यकर्त्याला हात लावाल तर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:17 IST

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. हे कायद्याचे राज्य आहे. आम्ही कायद्याचा सन्मानच करतो. मात्र, शासन आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. दबावतंत्राचा वापर केला जात आहे.

ठळक मुद्देचंद्रशेखर आझाड यांचा इशारा : भीम आर्मी संघटनेची सायन्सकोर मैदानात जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. हे कायद्याचे राज्य आहे. आम्ही कायद्याचा सन्मानच करतो. मात्र, शासन आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. दबावतंत्राचा वापर केला जात आहे. मला १६ महिने नजरकैदेत ठेवण्यात आले. परंतु खबरदार! भीम आर्मीच्या एकाही कार्यकर्त्याला हात लावाल तर आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ, संविधानाची काय ताकद आहे, हे दाखवून देऊ, असा इशारा देत, भीम आर्मीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर आझाद यांनी सत्ताधारी नेत्यांवर टीकास्त्र सोडले.भीम आर्मी जिल्हा व शहर शाखेच्यातीने सायन्सकोर मैदानावर भारत एकता मिशनची विदर्भस्तरीय जाहीर सभा शुक्रवारी दुपारी पार पडली. यावेळी मुख्य वक्ता म्हणून ते बोलत होते. या सभेत टिपू सुलतान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.कोरेगाव भीमानंतर मला नजरकैदेत ठेवण्यात आले. अमरावतीला माझी सभा होऊ नये, याकरिता काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातले. कायदा व नियमानुसार मला सभेला परवानगी मिळाली, असे चंद्रशेखर आझाद म्हणाले.बाबासाहेबांनी शिका, संघटिक व्हा आणि संघर्ष करा, असा मंत्र दिला. आता खऱ्या अर्थाने ती वेळ आली आहे. येणाºया निवडणुकीत भीम आर्मीची ताकद काय आहे, ते दाखवून द्या. आता दिल्लीच्या लाल किल्यावर निळा झेंडा लावण्याकरिता सज्ज व्हा, असे प्रतिपादन करीत यानंतर एकाही दलित, अल्पसंख्याक मुलीवर कुणी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यास नेत्यांची झोप उडवून टाकू, असा इशारा त्यांनी दिला. या देशात प्रत्येकाला मोफत शिक्षण, आरोग्य व न्याय व्यवस्था मिळाली पाहिजे, ही भीम आर्मीची खºया अर्थाने मागणी असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी बाबासाहेबांंच्या पुतळ्याला अभिवादन करून पदाधिकाºयांनी चंद्रशेखर आझाद यांना तलवार भेट देऊन जंगी स्वागत केले. त्यांनी तलवार उंचावत उपस्थित जनसमुदायासमोर संवाद साधला. इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भीम आर्मीत जाहीर प्रवेश केला. प्रमुख वक्ता शेख सुभान अली यांनीही विशेष शैलीतून शासनावर ताशेरे आढले. व्यासपीठावर, प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे, सुषमा अंधारे, प्रदेश सचिव मनीष साठे, अकबर भाई यांच्यासह पदाधिकाºयांची उपस्थित होती. प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष सुदाम बोरकर यांनी केले. सभेला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.भीम आर्मी ही सामाजिक चळवळअमरावती : भीम आर्मी हे पक्ष नसून, एक सामाजिक चळवळ आहे. जनसामान्यांना सन्मान, अधिकारांची जाणीव करून त्यांना तो हक्क मिळावा, यासाठीच आमचा प्रयत्न राहणार आहे, असे मत भीम आर्मीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद यांनी व्यक्त केले. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी येथील मराठी पत्रकार भवनात 'मीट द प्रेस'च्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या विचारावर चालणारे आझाद यांनी विविध राजकीय पक्षांच्या कार्यातून जनतेची कशी पिळवणूक झाली याचा उलगडा करीत सामान्यांच्या समस्या सोडविण्यावर आम्ही भर देणार असल्याचे सांगितले. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर त्यांनी अनेकांचे समाधान केले.