शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वोत्तम विकासकामे

By admin | Updated: January 10, 2015 22:47 IST

अमरावती जिल्हा व विभागीय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विकास कामे करण्यास तत्पर आहे. त्यांची कामाची आवड व तयारी लक्षात घेता आगामी काळात अमरावती जिल्ह्यात

अमरावती : अमरावती जिल्हा व विभागीय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विकास कामे करण्यास तत्पर आहे. त्यांची कामाची आवड व तयारी लक्षात घेता आगामी काळात अमरावती जिल्ह्यात सर्वोत्तम विकास कामे होतील, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला. ना.पोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, महापालिका आयुक्त अरुण डोंगरे, प्रकल्प अधिकारी संजय मीना, जिल्हा नियोजन अधिकारी काळे अन्य विभागप्रमुख उपस्थित होते. ना.पोटे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचा गौरव केला. जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याच्यादृष्टिने जिल्हा प्रशासनाने सुरु केलेला गाव मुक्काम कार्यक्रम प्रशंसनीय आहे. सन २०१४-१५ या वषार्तील खरीप हंगामा १९८१ गावात दुष्काळ जाहीर झाल्यामुळे शासनाकडून ३०२ कोटी रुपये दुष्काळ निधी मंजूर झाला. त्यापैकी १२५ कोटी रुपयांचे वाटप गाव पातळीवर होणार आहे. त्याचा शुभारंभ रविवार ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता चांदुर रेल्वे तालुक्यातील धनोडी येथे चावडी वाचनाचा कार्यक्रम होणार आहे. सर्व शेतकरी व ग्रामस्थांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सार्वजनिक हिताची बांधकामे तातडीने पूर्ण करावीत. विद्युत विभागाने बंद ट्रान्सफार्मर तातडीने दुरुस्त करावेत, शेतकऱ्यांची कोणतीही अडचण वा तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी जादा ट्रान्सफार्मर ठेवावेत. उद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी पाच लक्ष ते पाच कोटी गुंतवणुकीच्या उद्योगांची यादी तयार करुन त्यातील उद्योगांच्या संधी तसेच उत्पादनाचा तपशील बेरोजगार युवकांच्या माहितीसाठी दर्शनीय भागात ठेवावा. योजनांची माहिती बेरोजगारांना तत्परतेने देण्यात यावी. आपणास सर्वांना घेऊन ग्राम पातळीपर्यंत शासनाच्या विकास योजना घेऊन जावयाच्या आहेत. उद्योगात महिलांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिने उद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. शहर सौंदर्यीकरणाच्या कामे जे लोक किंवा स्वयंसेवी संस्था इच्छूक असतील त्यांना निमंत्रित करुन नियोजन करावे, सध्या टंचाई परिस्थिती असून सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने आपापल्या विभागाची कामे पूर्ण करावीत, असेही ते म्हणाले.यावेळी पालकमंत्र्यांनी अंगणवाडी बांधकाम, रस्त्यांची पूर्ण झालेली व प्रगतीपथावरील कामे, सामूहिक विवाह, वैयक्तिक लाभाच्या योजना, ग्रामीण भागातील वाहतूक सुधारणा, नाला खोलीकरण, नदी खोलीकरणाची कामे, जलसंवर्धनासाठी बांधकाम परवानगी देताना रेन हार्वेस्टिंग सक्तीचे करणे, आदी कामांचा तपशीलवार आढावा घेऊन मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)