लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुशीर आलम हत्याकांडातील सुनावणीदरम्यान न्यायालयीन प्रतीक्षालयात केक कापून आरोपी उमेश आठवलेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची तक्रार फिर्यादी पक्षाने शनिवारी पोलिसांत केली असून, याबद्दल पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी चौकशी करणार आहेत.साबण पुराजवळील एका हॉटेलसमोर १ नोव्हेंबर २०१५ रोजी मुशीर आलमची हत्या करण्यात आली. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी आरोपी उमेश आठवलेसह त्याच्या सहकार्याविरुद्ध गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली होती. या प्रकरणातील तीन आरोपी जामिनावर बाहेर असून, तीन आरोपी कारागृहात आहेत. या हत्याकांडातील सुनावणी जिल्हा न्यायाधीश (३) विमलनाथ तिवारी यांच्या न्यायालयात सुरू आहे. शुक्रवारी पोलिसांनी आरोपी उमेश आठवले, अंकुश जिरापुरेसह अन्य एकाला कारागृहातून न्यायालयात हजर करण्यासाठी आणले. सुनावणी सुरू असताना काही वेळाकरिता आरोपींना न्यायालयातील प्रतीक्षालयात थांबविण्यात आले होते. शुक्रवारी उमेश आठवलेचा वाढदिवस असल्यामुळे त्याचे काही मित्र केक घेऊन तेथे दाखल झाले. हातात हातकडी असलेल्या उमेश आठवले याने केक कापला.
न्यायालयाच्या प्रतीक्षालयात आरोपीचा बर्थ डे साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 23:08 IST
मुशीर आलम हत्याकांडातील सुनावणीदरम्यान न्यायालयीन प्रतीक्षालयात केक कापून आरोपी उमेश आठवलेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची तक्रार फिर्यादी पक्षाने शनिवारी पोलिसांत केली असून, याबद्दल पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी चौकशी करणार आहेत.
न्यायालयाच्या प्रतीक्षालयात आरोपीचा बर्थ डे साजरा
ठळक मुद्देमुशीर आलम हत्याकांड : डीसीपींकडून चौकशी