शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विमाधारक नसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ

By admin | Updated: April 20, 2016 00:24 IST

जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाचा विमा उतरविला आहे, त्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे.

शासन आदेशाची प्रतीक्षा : पिकांच्या नुकसानीसाठी मिळणार निम्मी रक्कमअमरावती : जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाचा विमा उतरविला आहे, त्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी या दोन्ही पिकांचा विमा काढला नाही, अशाही शेतकऱ्यांना विमा रकमेचा ५० टक्के रक्कम मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ऐन खरिपाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख २९ हजार २१४ हेक्टरवर सोयाबीन व १ लाख ८६ हजार ६६५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. अशी एकूण ५ लाख १५ हजार ८७९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. यापैकी ६० ते ७० टक्के क्षेत्राचा विमा काढण्यात आला म्हणजेच तीन लाख हेक्टर सोयाबीन व कपाशीचे क्षेत्र विमा संरक्षित आहे. या क्षेत्रासह उर्वरित २ लाख हेक्टर विमा न काढलेल्या क्षेत्रालादेखील या शासन योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी २ मार्च २०१६ रोजी शासनाने हा निर्णय घेतला. मात्र यासाठी अजूनही मंडळनिहाय पीक विमा न काढलेले क्षेत्राच्या नोंदी घेण्याचे काम सुरू झालेले नाही. महसूल व कृषी विभागाला अद्याप याविषयीचे आदेश प्राप्त नाही. शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील क्षेत्र आणि पिकांची नोंद ग्राह्य धरून शेतकऱ्यांना पिकांची ५० टक्के नुकसान भरपाई मिळणार आहे. जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंतही रक्कम मिळणार आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात पेरणी काळात अत्यल्प पाऊस व नंतर दीर्घकाळ पावसाची दडी यामुळे सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांना क्विंटलऐवजी किलोची झडती आली. जमिनीत आर्द्रता नसल्याने कपाशीची वाढ खुंटली व लाल्याचा प्रादुर्भाव यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात ४० टक्क्यांनी घट झाली. उत्पादन खर्च अधिक वाढल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी ऐच्छिक स्वरुपाचा विमा काढला नाही. या शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. तसेच पीक कर्जदार शेतकरी सभासदांसाठी पीक विमा योजना सक्तीची असल्याने त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. (प्रतिनिधी)अशी मिळणार मदतकापसाच्या नुकसान भरपाईपोटी विमा काढलेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ११ हजार रुपये व विमा न काढलेल्या शेतकऱ्यांच्या निम्मे म्हणजे साडेपाच हजार रुपये नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या खरीप पेरणीच्या पूर्व शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. असा आहे २ मार्चचा शासन निर्णयअमरावती व नागपूर विभागातील सोयाबीन व कापूस पिकांसाठी पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक योजनेनुसार मदत देण्यात येईल व ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय जाहीर केलेल्या रकमेच्या ५० टक्के शासनाकडून देण्यात येईल.