शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचा लाभ सर्व गावांना समप्रमाणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:01 IST

याबाबत पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या, अडीचशे कोटी खर्चाच्या या योजनेतून गुरुदेवनगर, मोझरी, माळेगाव, शिवगाव, शिरजगाव मोझरी, शेंदोळा खुर्द, शेंदोला बुद्रुक, घोटा, भांबोरा, कोडवन, अनकवाडी, रघुनाथपूर, मालधूर, वऱ्हा, वाठोडा खुर्द, रंभापूर, फत्तेपूर आदी गावांना लाभ मिळणार आहे. या योजनेतून अंदाजे ७ हजार १०९ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. या योजनेतून सर्व गावांना समप्रमाणात पाणी मिळणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. याबाबत कुठल्याही प्रकारे संभ्रम कुणीही बाळगू नये, असेही त्या म्हणाल्या.

ठळक मुद्दे यशोमती ठाकूर, १७,५६७ एकर शेतीचे सिंचन, २५० कोटींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ७ हजार १०९ हेक्टर सिंचनक्षमता असलेल्या व सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्चाच्या गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचा लाभ सर्वच गावांतील शेतीला समप्रमाणात होणार आहे, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी दिली.मोर्शी स्थित अप्पर वर्धा धरणाच्या तिवसा तालुक्यातून गेलेल्या उजव्या मुख्य कालव्यातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे, या हेतूने गुरुकुंज उपसा सिंचन योजना आकारास येत आहे. त्यासाठी पालकमंत्री ठाकूर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. याबाबत पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या, अडीचशे कोटी खर्चाच्या या योजनेतून गुरुदेवनगर, मोझरी, माळेगाव, शिवगाव, शिरजगाव मोझरी, शेंदोळा खुर्द, शेंदोला बुद्रुक, घोटा, भांबोरा, कोडवन, अनकवाडी, रघुनाथपूर, मालधूर, वऱ्हा, वाठोडा खुर्द, रंभापूर, फत्तेपूर आदी गावांना लाभ मिळणार आहे. या योजनेतून अंदाजे ७ हजार १०९ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. या योजनेतून सर्व गावांना समप्रमाणात पाणी मिळणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. याबाबत कुठल्याही प्रकारे संभ्रम कुणीही बाळगू नये, असेही त्या म्हणाल्या.माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांनी १९८४ मध्ये शेतकरी बांधवांना धरणाचे पाणी मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार अप्पर वर्धा धरण प्रकल्प प्रशासनाने सर्वेक्षणसुद्धा केले होते. तथापि, ज्या गावातील शेतकऱ्यांनी ही मागणी केली होती, ती गावे उंच भागावर, तर कालवा सखल भागात असल्याने कालव्यातून पाणी देण्याबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र, शेतकरीहितासाठी कायम कटिबद्धता ठेवून शेतकऱ्यांच्या पाण्यावरील हक्कासाठी सातत्याने भूमिका मांडली. विधिमंडळात पाठपुरावा केला. त्यानुसार ‘मोझरी गुरुकुंज उपसा सिंचन योजना’ आकारास आली, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भरघोस शेती उत्पादन घेण्याचा ‘स्पार्क’ आहे.  ही योजना त्यांच्या परिश्रमाचे चीज करेल, अशी अपेक्षा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. 

जलसंपदा मंत्र्यांसोबत लवकरच बैठकयोजनेची चाचणीसुद्धा पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते यावर्षी ३१ जुलै रोजी घेण्यात आली. पंप हाऊस व इतर सर्व कामे झाली, तर वितरणाची पन्नास टक्के काम पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा होत आहे. ही योजना पूर्णत्वास जाण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत विशेष बैठक लवकरच होणार आहे. यावेळी सर्व अडचणी दूर करण्याबाबत निर्णय होईल, अशी माहितीही पालकमंत्री ठाकूर यांनी दिली.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प