शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसी खेळली ‘गेम’; अन् तो फासावर झुलला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2023 21:28 IST

Amravati News प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने निराश झालेल्या प्रियकराने गळफास लावून जीव दिल्याची घटना येथे घडली.

अमरावती : तो तिच्या प्रेमात आकंठ बुडाला, त्याने तिला सर्वस्व मानले, तिनेदेखील त्याला लग्नास होकार दिला. मात्र, अलीकडे ती बदलली. त्याला टाळू लागली. त्याने तिला जाब विचारला असता, चक्क तिने लग्नास नकार दिला. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला व थेट फासावर झुलला. मात्र, आत्महत्येपूर्वी ‘तिने माझ्यासोबत खेळ खेळला,’ अशी सुसाईड नोट लिहून ठेवली. प्रेमाच्या अकाली मृत्यूची ही धक्कादायक घटना बुधवारी येथे घडली.

राहुल संजय चौरागडे (२२, रा. जनता कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट ताब्यात घेतली असली तरी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. ३१ मे रोजी दुपारी १२:३०च्या सुमारास राहुलने राहत्या घरी छताच्या कडीला गळफास घेतला. त्याच्या वहिनीने वर जाऊन पाहिले असता तो गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. त्या खोलीमधील टीपॉयवर त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठी आढळून आली. आपल्या मृत्यूला एक मुलगी कारणीभूत आहे. तिने आपल्याला लग्नासाठी होकार दिला होता. मात्र, ती आपल्याशी खेळ खेळली. त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे त्या चिठीत नमूद आहे. याप्रकरणी त्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्युचा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी पुढील तपास चालविला आहे. संबंधित मुलीचे बयान घेतले जाण्याची शक्यता आहे.

तीन वर्षांपासून सुरू होते लव्ह अफेअर

राजापेठ पोलिसांनुसार, राहुलचे संबंधित मुलीशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तो तिच्यावर अत्याधिक प्रेम करत होता. मात्र, अलीकडे ती अन्य व्यक्तीसोबत रमत असल्याचे त्याच्या लक्षात आले. तिने लग्नासही टोलवाटोलवी केली. मात्र, तो तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. त्यामुळे त्याला ‘नर्व्हसनेस’ आले. त्यातून त्याने आत्मघाताचे टोकाचे पाऊल उचलले, असा सुसाईड नोटवरून प्राथमिक निष्कर्ष काढता येऊ शकतो, असे राजापेठ पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यू