शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांचं हे वागणं बरं नव्हं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:00 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी आजवर अडचणीचा सामना करून कर्तव्य बजावले आहे. त्यांना कमी वेतनात संसार करणे  जिकरीचे जात आहे. हे सर्वानाच मान्य आहे. त्यामुळे संप करणे काहीच गैर नाही. मात्र, या संपाची शासनाने दखल घेतलेली आहे. त्यांनी वेतनवाढीचा प्रस्ताव देऊन वाढ केली. वेळेवर वेतन करण्याची हमी घेतली आहे. तरी संप मागे घेण्यात आलेला नाही. यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गत ५८ दिवसांपासून संप पुकारला आहे. राज्य शासनाने  विविध टप्प्यात वेतनवाढ जाहीर केली. दरमहा दहा तारखेच्या आत वेतन करण्याबाबत हमी घेतली आहे. तरीही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं हे वागणं बरे नव्हे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आजवर अडचणीचा सामना करून कर्तव्य बजावले आहे. त्यांना कमी वेतनात संसार करणे  जिकरीचे जात आहे. हे सर्वानाच मान्य आहे. त्यामुळे संप करणे काहीच गैर नाही. मात्र, या संपाची शासनाने दखल घेतलेली आहे. त्यांनी वेतनवाढीचा प्रस्ताव देऊन वाढ केली. वेळेवर वेतन करण्याची हमी घेतली आहे. तरी संप मागे घेण्यात आलेला नाही. यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संप कोठे तरी मिटविणे गरजेचे आहे.

दिवसभरात २२८७ जणांचा एस.टी.ने प्रवास-  अमरावती विभागातील आठपैकी तीन  आगारांमधून बुधवारी काही एसटी बस सोडण्यात आल्या. या माध्यमातून २२८७ जणांनी प्रवास केला. - अमरावती  विभागातील  अमरावती, मोर्शी, वरूड या तीन आगारातून बुधवारी १६ बस सोडण्यात आल्यात. मात्र, इतर आगारातून एकही बस सुटलेली नाही.

शासन सेवेत घेतल्याशिवाय माघार नाहीअतिशय तोकड्या पगारावर काम करून सेवा दिली आहे. अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा लढा हा हक्कासाठी सुरू आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण होणार नाही, तोपर्यंत लढा चालूच राहील.- सतीश कडू, एसटी कर्मचारी

प्रवासी आमचे दैवत समजून सेवा केली आहे. ज्येष्ठापासून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत प्रामाणिक सेवा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करून आमचा विश्वास सार्थ करावा व न्याय द्यावा. - श्रीकांत रोहनकर, वाहक 

आतापर्यंत २७० निलंबित

संपात सहभागी झालेल्या अमरावती विभागातील २७० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय सहा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. ११६ जण बडतर्फ केले आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप